Crude Oil Price : सौदी अरेबियाने (Saudi Arabia) आपल्या जुलै सिरिजमधील कच्च्या तेलाच्या किंमती वाढवल्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमती प्रती बॅरल 121 डाॅलरवर पोहोचल्या आहेत. त्यामुळे महागाईला तोंड देण्यासाठी मोदी सरकार आणि रिझर्व्ह बँकेकडून (RBI) प्रयत्न सुरू असताना महागडे कच्चे तेल अडचणीत वाढ करू शकते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या प्रति बॅरल किंमती 121 डाॅलरच्या पार गेल्या आहेत. युरोपीय संघाने रशियाबाबत घेतलेल्या निर्णयानंतर कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. कच्चे तेल महाग झाल्यास भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढण्याचा दबाव वाढतो, ज्यामुळे महागाई आणखी भडकू शकते.


कच्च्या तेलाचा भाव जूनच्या अखेरपर्यंत 130 डाॅलर ओलांडू शकतो असे तज्ज्ञांचे मत आहे. युरोपीय संघाने (European Union) रशियाबाबत घेतलेल्या निर्णयाचा कच्च्या तेलावर परिणाम होणार आहे. युरोपीय संघाने रशियाकडून कच्चे तेल न घेण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय अमेरिकेतील वाढत्या मागणीचाही परिणाम त्यावर दिसू शकतो. सध्याची आव्हाने लक्षात घेऊन ओपेकने उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, असे असतानाही किमती वाढत आहेत.


बचतीवरही विपरित परिणाम


घरात वापरल्या जाणाऱ्या ग्राहकोपयोगी वस्तूंपासून ते घराच्या बांधकामात वापरल्या जाणाऱ्या सिमेंट, स्टील, रंगासह अनेक वस्तूंना महागाईचा फटका बसला आहे. महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँकेला रेपो दरात वाढ करणे भाग पडते. त्यानंतर बँका कर्जावरील व्याजदरात वाढ करतात. यामुळे कर्ज महाग होते, ज्यामुळे तुमचा ईएमआय वाढतो. असे झाल्यास, बचतीतून पैसे द्यावे लागतील.


कच्च्या तेलामुळे स्वयंपाकघराचे बजेटही बिघडेल


कच्च्या तेलाच्या किमतीमुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढतात. त्यामुळे वाहतुकीचा खर्च वाढतो. खाद्यपदार्थांची वाहतूक मुख्यतः रस्त्याने ट्रकने केली जाते. उत्पादनाच्या अंतिम किमतीच्या जवळपास १४ टक्के वाहतूक खर्च येतो. अशा परिस्थितीत कच्च्या तेलामुळे पेट्रोल आणि डिझेल महागले, तर भाजीपाल्यापासून स्वयंपाकघरात वापरले जाणारे बहुतांश पदार्थ महागणार आहे.


भारत मोठ्या प्रमाणात खाद्यतेल आणि कडधान्ये आयात करतो. डॉलरच्या भाववाढीमुळे तेल आणि डाळींसाठी अधिक खर्च होणार असून, त्याचा परिणाम त्यांच्या किमतीवर होणार आहे. अशा परिस्थितीत, त्यांच्या महागड्यांमुळे, तुमचे स्वयंपाकघरचे बजेट खराब होऊ शकते. याशिवाय परदेशातील अभ्यास, प्रवास, डाळी, खाद्यतेल, कच्चे तेल, संगणक, लॅपटॉप, सोने, औषधे, रसायने, खते, जड यंत्रसामग्री जी आयात केली जाते ती महाग पडू शकते.


कच्चे तेल महाग होण्याची ५ कारणे



  • युरोपियन युनियनने रशियाकडून कच्चे तेल न घेण्याचा निर्णय घेतला

  • अमेरिकेत उन्हाळी हंगामाच्या सुरुवातीपासून वाढत्या मागणीचा परिणाम

  • सध्याच्या जागतिक वापरापेक्षा ओपेक उत्पादन वाढ कमी आहे

  • भारतासह जगभरातील व्यावसायिक मागणी झपाट्याने वाढली

  • इतर जागतिक चलनांच्या तुलनेत डॉलर वाढत आहे


इतर महत्त्वाच्या बातम्या