एक्स्प्लोर

थायलंडमध्ये गुहेत अडकलेल्या 12 पैकी सहा मुलांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश

थायलंडमध्ये गेल्या दोन आठवड्यांपासून गुहेत अडकलेल्या फुटबॉल टीममधील 12 पैकी सहा मुलांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आलं आहे. गुहेत पाणी वाढण्याची शक्यता असल्याने अडकलेल्या इतर मुलांना आणि त्यांच्या कोचला वाचवण्यासाठी बचावकार्य अधिक वेगाने सुरु आहे.

 बँकॉक : थायलंडमध्ये गेल्या दोन आठवड्यांपासून गुहेत अडकलेल्या फुटबॉल टीममधील 12 पैकी सहा मुलांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आलं आहे. गुहेत पाणी वाढण्याची शक्यता असल्याने अडकलेल्या इतर मुलांना आणि त्यांच्या कोचला वाचवण्यासाठी बचावकार्य अधिक वेगाने सुरु आहे. एएफपीच्या माहितीनुसार, ‘गुहेतून बाहेर काढलेल्या मुलांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गुहेत अडकलेल्या इतर सहा मुलांचे बचावकार्य सुरु आहे.’ गुहा पाहण्यासाठी गेलेली 12 मुलं पुराचे पाणी गुहेत शिरल्यामुळे गेल्या दोन आठवड्यांपासून अडकली आहेत. थायलंडमध्ये गुहेत अडकलेल्या 12 पैकी सहा मुलांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश अमेरिका, जपान, चीन आणि ऑस्ट्रेलिया या देशांतील तज्ञांची यासाठी मदत घेतली जात आहे. बचावकार्यात जवळपास तेराशे लोकांचा सहभाग आहे. “सगळ्या मुलांना गुहेतून सुरक्षित बाहेर काढण्यासाठी अमेरिका थायलंड सरकारसोबत काम करत आहे,” असं ट्वीट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं आहे. थायलंडमध्ये गुहेत अडकलेल्या 12 पैकी सहा मुलांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश मुलं गुहेत कशी अडकली? थायलंडमधील एका शाळेतील 12 मुलं फुटबॉल खेळल्यानंतर आपल्या कोचबरोबर 23 जूनला ‘टॅम लूंग’ ही गुहा पाहण्यासाठी गेली. पण गुहेत पुराचं पाणी आल्याने ही सर्व मुलं तिथंच अडकून पडली. त्यानंतर नॅशनल पार्कच्या कर्मचाऱ्यांना गुहेबाहेर सायकल आणि खेळाचं काही साहित्य दिसलं. याबाबत कर्मचाऱ्यांनी स्थानिक फुटबॉल क्लबशी संपर्क साधल्यानंतर 12 शालेय मुलं आणि त्यांचे कोच गुहेत अडकल्याचं समोर आलं. गुहेत अडकलेली ही मुलं 11 ते 16 वर्ष या वयोगटातील आहेत. तर कोचचं वय 25 वर्ष इतकं आहे. पुरपरिस्थिती लक्षात घेऊन थायलंड प्रशासनाने या मुलांना वाजवण्यासाठी बचावकार्य सुरु केलं. या गुहेची लांबी 10,316 मीटर एवढी असल्याची माहिती आहे आणि मुलं तब्बल चार किलोमीटर आतमध्ये अडकली आहेत. थायलंड प्रशासन मोठ्या मेहनतीने या मुलांना अन्न, पाणी ,औषधं, ऑक्सिजन यांसारख्या महत्त्वाच्या गोष्टी पुरवत आहे. ‘अडकलेली मुलं बाहेर येईपर्यंत आमचे सैनिक त्यांच्यासोबत असतील, मुलांच्या आरोग्याची काळजी घेतली जात असून त्यांना व्हिटामिनयुक्त अन्न दिलं जात आहे,’ असं बचाव पथकाच्या प्रवक्त्याने सांगितलं आहे.  

महत्त्वाच्या बातम्या

जे चलन असेल ते चालेल, सुरक्षा अन् विमा सुद्धा मिळेल; ट्रम्पच्या दाव्यांना झुगारत 'होर्मुझ'साठी इराणी संसदेत तगडा निर्णय
जे चलन असेल ते चालेल, सुरक्षा अन् विमा सुद्धा मिळेल; ट्रम्पच्या दाव्यांना झुगारत 'होर्मुझ'साठी इराणी संसदेत तगडा निर्णय
Miss Universe India 2026: केरळची काझिया लिझ मेजो ठरली 'मिस युनिव्हर्स इंडिया 2026' ची मानकरी; 'मिस युनिव्हर्स' स्पर्धेतही करणार भारताचे प्रतिनिधित्व
केरळची काझिया लिझ मेजो ठरली 'मिस युनिव्हर्स इंडिया 2026' ची मानकरी; 'मिस युनिव्हर्स' स्पर्धेतही करणार भारताचे प्रतिनिधित्व
मुसळधार पावसामुळं झोपड्यांवरच कोसळला कचऱ्याचा डोंगर, तब्बल 22 जणांचा जागीच मृत्यू, अेनकजण जखमी, बचावकार्य सुरु 
मुसळधार पावसामुळं झोपड्यांवरच कोसळला कचऱ्याचा डोंगर, तब्बल 22 जणांचा जागीच मृत्यू, अेनकजण जखमी, बचावकार्य सुरु 
Japan Earthquake : जपानमध्ये तासाभरात दोन वेळा भूकंप, टोक्यो, होक्काइडोमध्ये भूकंपाचे धक्के, 30 जण जखमी
जपानमध्ये तासाभरात दोन वेळा भूकंप, टोक्यो, होक्काइडोमध्ये भूकंपाचे धक्के, 30 जण जखमी

व्हिडीओ

Sanjay Raut Mumbai PC : मोदींचा जन्मच झाला नाही, ते अवतारी, त्यांच्या हातात सुदर्शन चक्र - संजय राऊत
Mazgaon Ganpati Bappa Rally Marathi News: मुंबईतील माझगावचा मोरया मंडळाच्या आगमन मिरवणुकीत नेमकं काय घडलं?
Amravati News : एवढी आग होती, जीवाची पर्वा न करता लेकरांन बाहेर काढलं, परिचारिकांनी सांगितला थरार
Amravati hospital fire news : व्हेंटिलेटरचा स्फोट, ICU कक्षात आग, अमरावतीत ३ बालकं दगावली
Solpaur Drought Marriage Special Report : 350 तरुणांची लग्न पाण्याखाली रखडली? ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Karj Mafi 2nd Installment : मोठी बातमी, शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी, 6,36,036 शेतकऱ्यांना 5086 कोटी रुपये वितरित
मोठी बातमी, शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी, देवेंद्र फडणवीस यांच्याकडून 5086 कोटी ट्रान्सफर
Rain Update: दिल्ली-एनसीआरमध्ये मुसळधार पाऊस, 15 विमानांचे मार्ग बदलले, मध्य प्रदेश-उत्तर प्रदेशात पूरसदृश परिस्थिती, वाराणसीत पोलीस ठाणे पाण्यात; छत्तीसगडमध्ये महिलेवर वीज कोसळली
दिल्ली-एनसीआरमध्ये मुसळधार पाऊस, 15 विमानांचे मार्ग बदलले, मध्य प्रदेश-उत्तर प्रदेशात पूरसदृश परिस्थिती, वाराणसीत पोलीस ठाणे पाण्यात; छत्तीसगडमध्ये महिलेवर वीज कोसळली
तुकाराम मुंढेंसारखे साखर कारखान्यांच्या गोडाऊनवर छापे टाका; शेतकरी संघटना आक्रमक, साखर 75 रुपये अन् ऊस 3 रु किलो
तुकाराम मुंढेंसारखे साखर कारखान्यांच्या गोडाऊनवर छापे टाका; शेतकरी संघटना आक्रमक, साखर 75 रुपये अन् ऊस 3 रु किलो
संजय बांगरांच्या मतदारसंघात भव्य कावड यात्रा, श्रावण महिन्यात भाविकांचा मोठा उत्साह; यात्रेला गर्दी किती?
संजय बांगरांच्या मतदारसंघात भव्य कावड यात्रा, श्रावण महिन्यात भाविकांचा मोठा उत्साह; यात्रेला गर्दी किती?
धक्कादायक! जामखेडमधील आनंद मेळाव्यात थरार; हवेत गिरक्या घेणाऱ्या पाळण्यातून खाली कोसळली तरुणी
धक्कादायक! जामखेडमधील आनंद मेळाव्यात थरार; हवेत गिरक्या घेणाऱ्या पाळण्यातून खाली कोसळली तरुणी
जे चलन असेल ते चालेल, सुरक्षा अन् विमा सुद्धा मिळेल; ट्रम्पच्या दाव्यांना झुगारत 'होर्मुझ'साठी इराणी संसदेत तगडा निर्णय
जे चलन असेल ते चालेल, सुरक्षा अन् विमा सुद्धा मिळेल; ट्रम्पच्या दाव्यांना झुगारत 'होर्मुझ'साठी इराणी संसदेत तगडा निर्णय
Manoj Jarange Patil : या पुढं सरकारने डाव टाकला की पुढचं आंदोलन मुंबई अन् मुख्यमंत्र्यांच्या वर्षावर, मनोज जरांगे पाटलांचा इशारा; 29 ऑगस्टच्या आंदोलनावर ठाम!
या पुढं सरकारने डाव टाकला की पुढचं आंदोलन मुंबई अन् मुख्यमंत्र्यांच्या वर्षावर, मनोज जरांगे पाटलांचा इशारा; 29 ऑगस्टच्या आंदोलनावर ठाम!
नाशिक कुंभमेळ्याच्या खर्चातील फक्त 0.1 टक्के रक्कम वापरली तरी राज्यातील मराठी माध्यमाच्या शाळा वाचतील: न्यायमूर्ती पी. बी. वराळे
नाशिक कुंभमेळ्याच्या खर्चातील फक्त 0.1 टक्के रक्कम वापरली तरी राज्यातील मराठी माध्यमाच्या शाळा वाचतील: न्यायमूर्ती पी. बी. वराळे
Embed widget