Britain Queen Elizabeth Second Died : ब्रिटनची (Britain) राणी एलिझाबेथ द्वितीय (Queen Elizabeth II) यांचं काल रात्री वृद्धपकाळानं निधन झालं. वयाच्या 96 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. ब्रिटिश राजघराण्याच्या सिंहासनावर सात दशके एलिझाबेथ द्वितीय विराजमान होत्या. एलिझाबेथ यांचा जन्म लंडनमध्ये 21 एप्रिल 1926 रोजी झाला होता. एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर ब्रिटनसह जगातील अनेक देशांनी शोक व्यक्त केला. 


स्कॉटलंडमधील बाल्मोरल (Balmoral) कॅसल या ठिकाणी त्यांनी अंतिम श्वास घेतला. या दरम्यान राजपरिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते. एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर ब्रिटनसह जगातील अनेक देशांनी शोक व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट करत शोक व्यक्त केला.  एलिझाबेथ यांच्या निधनानंतर आता प्रिन्स चार्ल्स हे ब्रिटनच्या गादीवर बसतील. 


एक दिवसापूर्वी घेतली होती लिज ट्रस यांची मुलाखत 


महाराणी एलिझाबेथ द्वितीय (Queen Elizabeth II) यांनी मंगळवारी ब्रिटनच्या नवनिर्वाचित राष्ट्रपती लिज ट्रस यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीबाबतच्या चिंता थोड्या कमी झाल्या होत्या. लिज ट्रस आणि राणी एलिझाबेथ यांच्या भेटीदरम्यानचे काही फोटो समोर आले होते. बुधवारी प्रिव्ही कौन्सिलच्या ज्येष्ठ मंत्र्याच्या बैठकीला शेवटच्या क्षणी त्यांची अनुपस्थिती त्यांच्या तब्येतीबद्दल काहीही न बोलता बरंच काही सांगून गेली होती.






महाराणी एलिझाबेथ यांचं बालपण 


राणी एलिझाबेथ द्वितीय यांचा जन्म 21 एप्रिल 1926 रोजी झाला. त्यानंतर त्यांचे आजोबा, आजोबा पाचवे जॉर्ज यांचं शासन होतं. त्यांचे वडील अल्बर्ट, ज्यांना नंतर जॉर्ज सहावे म्हणून नावारुपाला आले, ते पाचवे जॉर्ज यांचे दुसरे पुत्र होते. त्याची आई एलिझाबेथ, डचेस ऑफ यॉर्क होती. त्याच नंतर एलिझाबेथ म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. त्यानंतर राणी एलिझाबेथ द्वितीय म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या.


त्यांची बहीण राजकुमारी मार्गारेट आणि त्यांना त्यांच्या आई आणि शिक्षकांनी घरीच शिकवलं. 1950 मध्ये, त्यांची नॅनी क्रॉफर्डनं (Crawford) एलिझाबेथ आणि तिच्या बहिणीवर लिटिल प्रिन्सेस (The Little Princesses) नावाचं चरित्र लिहिलं. यामध्ये त्यांनी राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या लहाणपणाबद्दल सांगितलं होतं. त्यांनी लिहिलं होतं की, त्यांना घोडे आणि पाळीव कुत्रे खूप आवडतात. त्या अतिशय शिस्तप्रिय आणि जबाबदार स्वभावाच्या होत्या. यामध्ये, महाराणींच्या चुलत बहीण मार्गारेट रोड्स यांनी त्यांचं वर्णन एक मस्तीखोर लहान मुलगी म्हणून केलं आहे. त्यासोबतच महाराणी द्वितीय अतिशय संवेदनशील आणि सौम्य होत्या.


वयाच्या 25व्या वर्षी महाराणी म्हणून सिंहासनावर विराजमान 


ब्रिटनची राणी एलिझाबेथ द्वितीय आणि एडिनबर्गचे ड्यूक प्रिन्स फिलिप यांचा विवाह 20 नोव्हेंबर 1947 रोजी झाला. एलिझाबेथ यांचे पती फिलिप हे त्यांच्या नात्यातलेच. वयाच्या 13 व्या वर्षी एलिझाबेथ त्यांच्या प्रेमात पडल्या. या शाही जोडप्याची एक झलक पाहण्यासाठी बकिंगहॅम पॅलेसबाहेर लोकांनी मोठी गर्दी केली होती. या शाही जोडप्याच्या लग्नाच्या वेळी, भारत आपल्या स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करण्याच्या तयारीत होता. या जोडप्याचे पहिलं अपत्य प्रिन्स चार्ल्स यांचा जन्म 1948 मध्ये झाला. यानंतर 1950 मध्ये बकिंघम पॅलेसमध्ये राजकुमारी ऍनीचा जन्म झाला.


जवळजवळ पाच वर्षांचं वैवाहिक आयुष्य सरल्यानंतर एलिझाबेथ यांच्या आयुष्याला वेगळं वळण आलं. 1952 मध्ये शाही जोडपं केनियाच्या दौऱ्यावर होतं, तेव्हा त्यांच्या भेटीदरम्यान 6 फेब्रुवारी 1952 रोजी राजा जॉर्ज सहावे यांचं दुर्दैवी निधन झालं आणि या दिवशी सर्वकाही बदललं. त्यावेळी राजकुमारी एलिझाबेथ फक्त 25 वर्षांच्या होत्या. दौऱ्यावरुन त्या परतल्या त्या महाराणी म्हणूनच. 2 जून 1953 रोजी वेस्टमिन्स्टर अॅबे येथे त्यांचा राज्याभिषेक झाला. तेव्हापासून, त्यांनी ब्रिटनच्या 14 पंतप्रधानांसोबत काम केलं आहे. जरी त्यांनी 15 व्या पंतप्रधान लिझ ट्रससोबत काम करण्यापूर्वी जग सोडलं असलं तरी ब्रिटननं तीन महिन्यांपूर्वी राणीच्या कारकिर्दीला 70 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त प्लॅटिनम ज्युबिली साजरी केली. त्यात लाखो लोकांनी सहभाग घेतला आणि जगभरातील लोकांनी ते टीव्हीवर पाहिलं. 


महाराणी दोन वाढदिवस साजरे करायच्या 


ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचा राज्याभिषेकाला (Coronation) 2022 मध्ये 69 वर्ष पूर्ण झाली. महाराणी 2 जून 1953 रोजी ब्रिटनच्या राजगादीवर विराजमान झाल्या होत्या. राज्याभिषेक झाल्यानंतर त्या ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडसह कॉमनवेल्थ देशांवरही त्यांचं वर्चस्व होतं. यासोबतच खास गोष्ट म्हणजे, तेव्हापासून त्यांना दोन वाढदिवस साजरे करण्याची परवानगी मिळाली. त्यांचा खरा वाढदिवस 21 एप्रिल रोजी होता. पण राज्याभिषेकनंतरचा दुसरा वाढदिवस हा अधिकृत वाढदिवस असल्यानं त्या दिवसाला विशेष होतं. 17 जूनला हा वाढदिवस साजरा केला जात होता. या दिवशी वाढदिवसाला वार्षिक परेडचं आयोजन केलं जात होतं. या दिवशी संपूर्ण ब्रिटनमधून लोक येत असतात. एप्रिल 2022 मध्येच त्यांनी त्यांचा 96वा वाढदिवस साजरा केला होता.


घानाच्या दौऱ्यानंतर जगभरात ओळख 


दुसरं महायुद्ध जिंकूनही ब्रिटन कमकुवत झाला होता. जगातील अनेक देशांवर ब्रिटनचं राज्य होतं. याचा परिणाम असा झाला की, त्या-त्या देशांतून ब्रिटननं माघार घेण्यास सुरुवात केली. 1961 मध्ये एक वेळ अशी आली की, जगाच्या नजरेत राणी म्हणून त्यांचा दर्जा उंचावला. जेव्हा फक्त 25 वर्षांची रानी घानाला गेली होती. त्यानंतर 1957 मध्ये स्वतंत्र झालेला हा देश भीषण हिंसाचाराच्या काळातून जात होता. राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या भेटीच्या पाच दिवस आधी तिथे बॉम्ब हल्ले झाले होते. येथील राज्यकर्त्यानं एका तरुण राणीसोबत एकत्र काम करण्याचं मान्य केलं आणि त्यामुळे राष्ट्रकुल देशांवर खोलवर परिणाम झाला. 


संकटकाळातही ठाम राहणाऱ्या महाराणी एलिझाबेथ 


आपल्या शासन काळात अनेक संकट आली, पण महाराणी एलिझाबेथ यांनी कधी माघार घेतली नाही. पंतप्रधान मार्गन थॅचर यांच्याशी त्यांचं अनेक बाबतीत एकमत होत नव्हतं. पण तरीही त्यांनी माघार घेतली नाही. सत्ता राखली आणि यशस्वीपणे चालवलीदेखील. 1966 मध्ये साऊथ वेल्स अबेरफान कोळसा खाणीत भूस्खलन झालं. यामध्ये 100 हून अधिक बालकांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांनी तिथला दौरा पुढे ढकलला, मात्र यासाठी त्यांना टीकेला सामोरं जावं लागलं. या अपघातानंतर काही दिवसांनी त्या तिथे पोहोचल्या. महाराणींची बहीण राजकुमारी मॉर्गेटनं घटस्फोटिताशी लग्न केले तेव्हा त्यांनी हा निर्णय जवळजवळ एक वर्षासाठी पुढे ढकलला.


कदाचित ब्रिटनच्या राजघराण्यातील प्रिन्स चार्ल्स आणि डायना यांच्या लग्नानंतर आणि त्यानंतर डायनाच्या मृत्यूनंतर त्यांना ब्रिटनमध्येच नाहीतर संपूर्ण जगाची टीका सहन करावी लागली होती. डायनाच्या मृत्यूचाही आरोप राजघराण्यावर आला, पण हार न मानता महाराणी एलिझाबेथ यांनी आपलं दुःख जाहीरपणे व्यक्त केलं. जेव्हा प्रिन्स हॅरी आणि त्यांची पत्नी मेघन मार्कल यांनी शाही कर्तव्यातून पायउतार होण्याचा निर्णय घेतला, तेव्हा कोणताही विलंब न करता, महाराणी यांनी त्यांना शाही कर्तव्यातून काढून टाकलं. तसेच सर्व 'रॉयल ​​हायनेस सारखी' पदं परत घेतली.


2021 मध्ये पतीचा मृत्यू 


राणी एलिझाबेथ द्वितीय आणि प्रिन्स फिलिप यांनी लग्नाची 73 वर्ष पूर्ण केली आणि यासोबतच त्यांचे प्रिन्स फिलिपनं यांनी त्यांचा कायमचा निरोप घेतला. 99 वर्षीय प्रिन्स फिलिप यांचं 9 एप्रिल 2021 रोजी निधन झालं. त्यावेळी हे शाही जोडपं कोरोना व्हायरस लॉकडाऊन दरम्यान लंडनमधील विंडसर कॅसलमध्ये राहत होते.


जेव्हा महाराणी म्हणाल्या होत्या, "माझं आयुष्य तुमच्या सेवेसाठीच" 


राजकुमारी एलिझाबेथ म्हणून ज्यावेळी त्यांनी त्यांचा 21वा वाढदिवस साजरा केला होता. त्यावेळी त्यांनी देशाला पहिल्यांदा संबोधित केलं होतं. त्यांचं हे भाषण केप टाऊनमधून (Cape Town) रेडिओवर ब्रॉडकास्ट करण्यात आलं होतं. तेव्हा त्या म्हणाल्या की, "मी याची घोषणा करते की, माझी आयुष्य लहान असो वा मोठं नेहमीच तुमच्या सेवेसाठी असेल."