Queen Elizabeth II Death : ब्रिटनच्या (Britain) महाराणी एलिझाबेथ द्वितीय (Queen Elizabeth II) यांच्या निधनानंतर जगभरात शोककळा पसरली आहे. तब्बल 7 दशकं ब्रिटनवर राज्य करणाऱ्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांनी वयाच्या 96व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. यानंतर जगभरातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. दरम्यान, एलिझाबेथ यांच्या मृत्यूनंतर 'कोहिनूर' (Kohinoor) सोशल मीडियावर (Social Media) ट्रेंड करत आहे. पण का? जाणून घेऊया... 


तब्बल 7 दशकं ब्रिटनची गादी सांभाळल्यानंतर राणी एलिझाबेथ द्वितीय यांचं वयाच्या 96 व्या वर्षी गुरुवारी, 8 सप्टेंबर रोजी निधन झालं. महाराणी एलिझाबेथ द्वितीय ब्रिटनमध्ये सर्वाधिक काळ राज्य करणारी राजेशाही व्यक्ती ठरल्या आहेत. 


महाराणी एलिझाबेथ द्वितीय च्या मृत्यूनंत 'कोहिनूर'चा ट्रेंड 


सध्या एकीकडे एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर जगभरातील अनेक मोठे देश शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत. दरम्यान, 'कोहिनूर' सोशल मीडियावर ट्रेंड करू लागला आहे. वृत्त लिहिपर्यंत ट्विटरवर कोहिनूरबाबत 21 हजारांहून अधिक ट्वीट करण्यात आले आहेत.


महाराणींच्या मुकूटावर जडलाय कोहिनूर 


महाराणी एलिझाबेथ यांच्या मृत्यूनंतर कोहिनूर ट्रेंड होण्याचं मुख्य कारण म्हणजे, राणी एलिझाबेथ द्वितीयचा मुकुट. ज्यावर भारतातील प्रसिद्ध हिरा कोहिनूर जडवण्यात आला आहे. याशिवाय त्यांच्या मुकुटावर दोन हजार आठशेहून अधिक हिरे असल्याचं सांगण्यात येत आहे. ज्यामध्ये सर्वात प्रसिद्ध हिरा कोहिनूर जडवण्यात आला आहे. सध्या सोशल मीडियावर युजर्स महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर कोहिनूर हिरा परत आणण्याबाबत बोलत आहेत. 


दरम्यान, ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय (Queen Elizabeth II) 2 जून, 1953 रोजी ब्रिटनच्या (Britain) राजगादीवर विराजमान झाल्या. त्यांचा राज्याभिषेकाला जून 2022 मध्ये 69 वर्ष पूर्ण झाली. राज्याभिषेक झाल्यापासून आतापर्यंत त्यांनी ब्रिटनच्या तब्बल 14 पंतप्रधानांसोबत काम केलं आहे.  


वयाच्या 25व्या वर्षी महाराणी म्हणून सिंहासनावर विराजमान 


ब्रिटनची राणी एलिझाबेथ द्वितीय आणि एडिनबर्गचे ड्यूक प्रिन्स फिलिप यांचा विवाह 20 नोव्हेंबर 1947 रोजी झाला. एलिझाबेथ यांचे पती फिलिप हे त्यांच्या नात्यातलेच. वयाच्या 13 व्या वर्षी एलिझाबेथ त्यांच्या प्रेमात पडल्या. या शाही जोडप्याची एक झलक पाहण्यासाठी बकिंगहॅम पॅलेसबाहेर लोकांनी मोठी गर्दी केली होती. या शाही जोडप्याच्या लग्नाच्या वेळी, भारत आपल्या स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करण्याच्या तयारीत होता. या जोडप्याचे पहिलं अपत्य प्रिन्स चार्ल्स यांचा जन्म 1948 मध्ये झाला. यानंतर 1950 मध्ये बकिंघम पॅलेसमध्ये राजकुमारी ऍनीचा जन्म झाला.


जवळजवळ पाच वर्षांचं वैवाहिक आयुष्य सरल्यानंतर एलिझाबेथ यांच्या आयुष्याला वेगळं वळण आलं. 1952 मध्ये शाही जोडपं केनियाच्या दौऱ्यावर होतं, तेव्हा त्यांच्या भेटीदरम्यान 6 फेब्रुवारी 1952 रोजी राजा जॉर्ज सहावे यांचं दुर्दैवी निधन झालं आणि या दिवशी सर्वकाही बदललं. त्यावेळी राजकुमारी एलिझाबेथ फक्त 25 वर्षांच्या होत्या. दौऱ्यावरुन त्या परतल्या त्या महाराणी म्हणूनच. 2 जून 1953 रोजी वेस्टमिन्स्टर अॅबे येथे त्यांचा राज्याभिषेक झाला. तेव्हापासून, त्यांनी ब्रिटनच्या 14 पंतप्रधानांसोबत काम केलं आहे. जरी त्यांनी 15 व्या पंतप्रधान लिझ ट्रससोबत काम करण्यापूर्वी जग सोडलं असलं तरी ब्रिटननं तीन महिन्यांपूर्वी राणीच्या कारकिर्दीला 70 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त प्लॅटिनम ज्युबिली साजरी केली. त्यात लाखो लोकांनी सहभाग घेतला आणि जगभरातील लोकांनी ते टीव्हीवर पाहिलं. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


वयाच्या 25व्या वर्षी राजगादीवर विराजमान, तब्बल सात दशकांचा राजेशाही प्रवास; कोण होत्या ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ?