Queen Elizabeth Death : ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ (Queen Elizabeth) द्वितीय यांचं काल वृद्धपकाळानं निधन झालं. वयाच्या 96 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ब्रिटिश राजघराण्याच्या सिंहासनावर सात दशके एलिझाबेथ द्वितीय विराजमान होत्या. महाराणी एलिजाबेथ यांनी 70 वर्ष सिंहासनाची धुरा सांभाळली. आता त्यांच्या निधनानंतर शाही परिवारात सत्तांतरण कसं होणार याकडे लक्ष लागून आहे. महाराणी एलिजाबेथ यांच्यानंतर आता शाही परिवाराची गादी प्रिन्स चार्ल्स यांच्याकडे येणार आहे. त्यांची नवीन महाराज म्हणून घोषणा करण्यात येणार आहे.  याबाबत ब्रिटन सरकारनं एक प्लॅनच तयार केला आहे. या प्लॅनला ऑपरेशन लंडन ब्रीज इज डाऊन असं नाव देण्यात आलं आहे. हा एक कोड आहे जो गोपनीय असतो. मात्र काही दिवसांपूर्वी यातील काही महत्वाच्या गोष्टी जगासमोर आल्या होत्या. 


नियमानुसार महाराणी एलिजाबेथ यांच्या निधनानंतर त्याबाबत पंतप्रधान लिज ट्रस यांना फोन कॉलवरुन माहिती देण्यात आली. सरकारी अधिकारी त्यांना याबाबत माहिती देतो. त्यानंतर प्रेस असोशिएशनवरुन याचं वृत्त दिलं जातं. शाही परिवार यानंतर सर्व प्रकारची तयारी करतो. प्रथेनुसार महाराणी एलिजाबेथ यांचे डोळे बंद करुन प्रिन्स चार्ल्स यांची नवीन महाराज म्हणून घोषणा होईल. 


महाराणी एलिजाबेथ यांच्या मृत्यूनंतर बकिंगहॅम पॅलेसच्या दारात शोक धारण केलेला एक कर्मचारी येईल जो एक नोटीस गेटवर लावेल. गेटवर नोटीस लावल्यानंतर राजवाड्याच्या वेबसाईटचं रुपांतर शोक संदेशात होईल. एकाच पृष्ठाच्या वेबसाइटवर तो एकमेव संदेश दिसेल. सर्व कार्यक्रम थांबवले जातील. बीबीसीचे 1,2 आणि 4 चे सर्व कार्यक्रम थांबवले जातील. यूके संसद तसेच स्कॉटलंड, वेल्स आणि उत्तर आयर्लंडमधील देखील सर्व कामकाज तहकूब केले जाईल. संसदेचे कामकाज होत नसेल तर ते बोलावले जाईल. सर्व सरकारी संकेतस्थळांवरही काळे बॅनर असतील.


महाराणी एलिजाबेथ यांच्यावर 10 दिवसांनी अंत्यसंस्कार


महाराणी एलिजाबेथ यांच्यावर अंत्यसंस्कार  10 दिवसांनी होणार आहेत. यासंदर्भात पहिले निवेदन पंतप्रधान देणार आहेत. सरकारमधील सर्व मंत्र्यांना पंतप्रधानांच्या वक्तव्यापूर्वी काहीही बोलू नका, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. संरक्षण मंत्रालयाकडून त्यांना सलामी देण्यात येणार असून देशभरात एक मिनिट मौन पाळण्यात येणार आहे. नवीन महाराज प्रिन्स चार्ल्स यांच्या उपस्थितीत पंतप्रधान  ट्रस संबोधित करतील, हे भाषण देशभरात प्रसारित होईल.  


इतर महत्वाच्या बातम्या


ब्रिटनची राणी एलिझाबेथ-2 यांचे निधन, वयाच्या 96 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास


Queen Elizabeth Death : ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचं निधन, पंतप्रधान मोदींकडून श्रद्धांजली