एक्स्प्लोर

Priyanka Chaturvedi On Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांच्या समोर गोळीबार, प्रियंका चतुर्वेदींच्या ट्विटने भारतासह जगाचं लक्ष वेधलं, काय म्हणाल्या?

Priyanka Chaturvedi On Donald Trump: संपूर्ण जगभरातील नेत्यांनी ट्रम्प यांच्या सुरक्षेबद्दल समाधान व्यक्त केले. मात्र शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी केलेल्या एक्स पोस्टने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. 

Priyanka Chaturvedi On Donald Trump: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) थांबलेल्या हॉटेलवर गोळीबार झाला. वॉशिंग्टन डीसीमधल्या हिल्टल हॉटेलमध्ये ट्रम्प यांच्यसमोरच गोळीबार झाला. यावेळी पत्नी मेलानियाही ट्रम्प यांच्यासोबत होत्या.'व्हाईट हाऊस करस्पाँडेंट्स डिनर'साठी ट्रम्प दाम्पत्य आलं होतं. गोळीबारानंतर दोघांनाही तातडीनं सुरक्षित स्थळी नेण्यात आलं. बॉलरुमच्या वरच्या मजल्यावर हा गोळीबार झाला. गोळीबारानंतर 'सीक्रेट सर्व्हिस'च्या जवानांनी ट्रम्प यांना सुरक्षित स्थळी नेलं. तसंच संशयित हल्लेखोराला जिवंत पकडलं. 

प्रियंका चतुर्वेदींच्या ट्विटने भारतासह जगाचं लक्ष वेधलं- (Priyanka Chaturvedi On Donald Trump)

डोनाल्ड ट्रम्प यांच्या समोर गोळीबार झाला. या घटनेनंतर संपूर्ण जगभरातील नेत्यांनी ट्रम्प यांच्या सुरक्षेबद्दल समाधान व्यक्त केले. मात्र शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी केलेल्या एक्स पोस्टने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. वॉशिंग्टन डी.सी. येथील 'व्हाइट हाउस करस्पॉन्डन्ट्स डिनर' कार्यक्रमातून काही चिंताजनक दृश्ये आणि गोळीबाराचे आवाज कैद करणारे व्हिडीओ समोर आले आहेत. जग इतक्या वेगाने बदलत आहे की हे बदल समजून घेणेच कठीण झाले आहे, असंही प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या.

पुढे प्रियंका चतुर्वेदी यांनी पुन्हा एक पोस्ट केली. यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला नरक म्हणून संबोधले होते. या विधानाचा प्रियंका चतुर्वेदी यांनी समाचार घेतला. अमेरिकेतील बंदुकांची समस्या अत्यंत गंभीर आहे. हा असा एक मुद्दा आहे जो बंदुकांसंबंधी एखादी घटना घडल्यानंतर दरवर्षी चर्चेत येतो.बंदूक हिंसाचाराचा सामना करण्याच्या बाबतीत, अमेरिका स्वतःच प्रभावीपणे एक 'नरक' बनली आहे, अशा शब्दात प्रियंका चतुर्वेदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना सुनावले.

नरेंद्र मोदी काय म्हणाले? (Narendra Modi On Donald Trump)

सदर घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत भारताची भूमिका स्पष्ट केली असून ट्रम्प यांच्या सुरक्षेबद्दल समाधान व्यक्त केले आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, "राष्ट्राध्यक्ष ट्रम्प, फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प आणि उपराष्ट्रपती हे वॉशिंग्टन डीसीमधील घटनेनंतर सुरक्षित आहेत, हे जाणून समाधान वाटले. मी त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा देतो. लोकशाहीत हिंसेला कोणतंही स्थान नाही आणि अशा कृत्यांचा पूर्णपणे निषेध केला पाहिजे," असं नरेंद्र मोदी म्हणाले.

कोण आहे हल्लेखोर? (Donald Trump Hotel Incident)

  • कोल टॉमस अॅलन असे 31 वर्षीय हल्लेखोराचे नाव
  • शिक्षक आणि व्हिडीओ गेम डेवलपर म्हणून काम करतो
  • टोरान्समधल्या लॉस एंजल्स उपनगरात वास्तव्याला
  • सी-2 एज्युकेशनमध्ये 'डिसेंबर 2024 चा सर्वोत्तम शिक्षक' पुरस्कार विजेता
  • 2017 ला कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून मेकॅनिकल इंजिनियर
  • अॅलन हा मेकॅनिकल इंजिनियर आणि कॉम्प्युटर सायन्समध्ये मास्टर्स उत्तीर्ण
  • अॅलनकडून 2024 मध्ये कमला हॅरीसना प्रचारासाठी 25 डॉलर्सची देणगी

संबंधित बातमी:

Donald Trump News: धाड धाड...गोळीबार होताच डोनाल्ड ट्रम्प खाली बसले, हॉटेलमधून निघताना खाली पडले, नेमकं काय घडलं?, PHOTO

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read More

महत्त्वाच्या बातम्या

US vs Iran : ट्वीट करुन होर्मुझवर ताबा मिळणार नाही, डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यावर इराणचा पलटवार
US vs Iran : ट्वीट करुन होर्मुझवर ताबा मिळणार नाही, डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यावर इराणचा पलटवार
Indonesia Earthquake: इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, सांगितला इतिहास
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, सांगितला इतिहास
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
Ambernath MNS-BJP Clash : अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
Nalasopara Crime Cake Shop: चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
Bhavesh Kaware and Raj Thackeray: मुंबईत नॉनव्हेज खाणाऱ्यांना घर नाकारल्यामुळे अडचणीत सापडला, आता भावेश कावरे राज ठाकरेंना भेटणार
मुंबईत नॉनव्हेज खाणाऱ्यांना घर नाकारल्यामुळे अडचणीत सापडला, आता भावेश कावरे राज ठाकरेंना भेटणार
Dombivli Crime Train Accident: डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
Embed widget