PM Modi: डेन्मार्कच्या अर्थपूर्ण’ भेटीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी पॅरिसला पोहोचले आहेत. डेन्मार्कच्या भेटीदरम्यान मोदींनी पंतप्रधान मेटे फ्रेडरिक्सन यांची भेट घेतली. यासोबतच या भेटीनंतर पंतप्रधान मोदी यांनी दुसऱ्या भारत-नॉर्डिक शिखर परिषदेला हजेरी लावली.
तीन युरोपीय देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यावर पंतप्रधान मोदी हे मंगळवारी बर्लिनहून येथे आले होते. डॅनिश पंतप्रधान मेटे फ्रेडरिक्सन यांच्याशी मोदींची मंगळवारी अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. त्यांनी भारतीय समुदायालाही संबोधित केले आणि डॅनिश राजघराण्याशी संवाद साधला. पंतप्रधान मोदी बुधवारी डेन्मार्कमधील दुसऱ्या भारत-नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी झाले होते. परिषदेत प्रामुख्याने साथीच्या कोरोना संकटानंतर आर्थिक पुनर्प्राप्ती, हवामान बदल, ऊर्जा आणि जागतिक सुरक्षा परिदृश्य यावर लक्ष केंद्रित केले गेले. शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर मोदींनी नॉर्वे, स्वीडन, आइसलँड आणि फिनलंड येथील त्यांच्या समकक्षांशी द्विपक्षीय बैठका घेतल्या आणि त्यांच्याशी द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याच्या मार्गांवर चर्चा केली.
मोदी फ्रान्समध्ये मॅक्रॉन यांची भेट घेणार
पॅरिसमध्ये अल्पावधीत मोदी इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट घेतील. एप्रिलमध्ये फ्रान्सच्या अध्यक्षपदी फेरनिवड झाल्यानंतर मॅक्रॉन यांच्यासोबत बैठक घेणारे मोदी हे पहिले जागतिक नेते असतील. मॅक्रॉन यांची अध्यक्षपदी पुन्हा निवड झाल्याबद्दल मोदींनी त्यांचे अभिनंदन केले होते. मोदींनी ट्विट केले होते की, “माझा मित्र इमॅन्युएल मॅक्रॉन यांची पुन्हा निवड झाल्याबद्दल अभिनंदन. भारत-फ्रेंच धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी एकत्र काम करत राहण्यास मी उत्सुक आहे.”
इतर महत्वाच्या बातम्या:
- बर्लिनमध्ये पंतप्रधान मोदींना देण्यात आलं 'गार्ड ऑफ ऑनर', जर्मनीच्या चॅन्सेलरची घेतली भेट
- 'युद्धाने कोणताही देश जिंकत नाही', रशिया-युक्रेन युद्धाबाबत पंतप्रधान मोदी यांचा वक्तव्य
- Russia Ukraine War : रशियाला आणखी एक झटका, दोन जहाज नष्ट केल्याचा युक्रेनचा दावा
- कॅन्सरच्या ऑपरेशनसाठी पुतिन जाणार रजेवर, राष्ट्राध्यपदाची जबाबदारी सांभाळणार 'हा' नेता