India :  'स्वप्न नगरी' म्हणून मुंबई शहराची ओळख आहे. प्रत्येक जण आपल्या काहीतरी स्वप्न घेऊन मुंबईत येतो आणि ती पूर्ण करण्याच्या प्रयत्नात असतो.अशातच परराज्यातून मुंबईत काही ना काही स्वप्न उराशी बाळगून येणाऱ्यांना महागाईचा फटका बसत आहे. भाड्याच्या घरापासून ते खाण्यापिण्याच्या खर्चापर्यंत मुंबईत राहणं आता मुश्किल झालं आहे. अशातच, एका सर्वेक्षणातून, सर्वात महागड्या शहरांच्या क्रमवारीत मुंबई (Mumbai) शहर अग्रस्थानी असल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर नवी दिल्ली (New Delhi) आणि बंगळुरू (Bengaluru) अनुक्रमे भारतातील महागड्या शहरांच्या यादीत दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत.


मर्सरच्या 2023 कॉस्ट ऑफ लिव्हींग सर्व्हेनुसार (Mercer's 2023 Cost of Living survey), पाच खंडांतील 227 शहरांपैकी जागतिक स्तरावर महागड्या शहरांमध्ये मुंबई 147व्या स्थानावर आहे. त्यानंतर नवी दिल्ली (169), चेन्नई (184), बंगळुरू (189), हैदराबाद (202), कोलकाता (211), आणि पुणे (213) स्थानावर आहे. मुंबई हे देशातील सर्वात महागडं शहर आहे. तर, जागतिक स्तरावर हाँगकाँग (HongKong) हे सर्वात महागडं शहर आहे. 


वस्तू आणि घरांच्या किंमती सर्वाधिक


दरवर्षी होणाऱ्या या सर्वेक्षणात घर, वाहतूक खर्च, घरगुती वापराच्या वस्तूच्या किंमती, अन्नधान्य, कपडे, मनोरंजन आणि इतर खर्चाबद्दल सर्वेक्षण केलं जातं. या अगोदर दिल्ली हे देशातील सर्वात महागडे शहर म्हणून ओळखले जायचे. यंदाच्या या सर्वेक्षणात पुन्हा मुंबई हे महागडं शहर असल्याचं उघड झालं आहे. मुंबईतील राहणीमान हे दिवसेंदिवस अधिक खर्चाचं बनत चाललं आहे, येथे सर्व गोष्टींसाठी अधिक पैसे आकारायला लागत असल्याचं सर्वेक्षणातून समोर आलं आहे.


जागतिक स्तरावर हाँगकाँग हे सर्वात महागडं शहर


आशिया खंडात (Asia Continent) सर्वात महागडं राहणीमान आणि जीवनशैली ही हाँगकाँग (HongKong) शहराची आहे. त्यानंतर सिंगापूर (Singapore) आणि झुरिच (Zurich) या शहरांचा नंबर लागतो. 


महागडं राहणीमान असलं तरी मुंबईकडेच लोकांचा अधिक कल


मुंबई शहर (Mumbai City) जरी महागडं असलं तरीही राहण्यासाठी मुंबई शहराकडेच लोकांचा सर्वाधिक कल असल्याचं देखील सर्वक्षणातून समोर आलं आहे. संपूर्ण देशातील विविध कंपन्यांची पहिली पसंती ही मुंबईलाच आहे. देशातील इतर शहरांचा विचार केला तर मुंबईमध्ये सर्वाधिक कंपन्या आहेत. आयटी क्षेत्रातील कंपन्यांची (IT Company) जास्त पसंती मुंबईच शहरालाच आहे.


हेही वाचा:


Scholarship 2023: दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! 'ही' संस्था देत आहे मोठी स्कॉलरशिप