एक्स्प्लोर

22 वर्षांनंतर पोप फ्रान्सिस येणार भारत दौऱ्यावर, पंतप्रधान मोदींना दिलं आश्वासन

Pope Francis Meets PM Modi : जवळपास 20 वर्षानंतर भारतीय पंतप्रधानन आणि धर्मगुरु पोप यांची ही पहिलीच भेट ठरली.

Pope Francis Meets PM Modi at the Vatican : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या विदेश दौऱ्यावर आहेत. यावेळी व्हॅटिकन शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पोप फ्रान्सिस यांची भेट झाली. व्हॅटिकनमधील अपोस्टोलिक राजवाड्यात झालेल्या एका खासगी कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पोप फ्रान्सिस स्वागत केले. पोप फ्रान्सिस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये जवळपास 20 मिनिटं चर्चा झाली. या चर्चेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोप फ्रान्सिस यांना भारत भेटीचं आमंत्रण दिलं. आपण लवकरच भारताच्या दौऱ्यावर येऊ असं आश्वासन पोपनी पंतप्रधानांना दिलं आहे. जवळपास 22 वर्षानंतर पोप फ्रान्सिस भारत दौऱ्यावर येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भेटीदरम्यान माननीय कार्डीनल पिएत्रो पारोलिन यांची देखील भेट घेतली. 

पोप फ्रान्सिस यांनी 30 ऑक्टोबर 2021 ला व्हॅटिकन शहरातील अपोस्टोलिक राजवाड्यात झालेल्या एका खासगी कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले. जवळपास 20 वर्षानंतर भारतीय पंतप्रधानन आणि धर्मगुरु पोप यांची ही पहिलीच भेट ठरली. जून 2000 मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी व्हॅटिकनला भेट देऊन तत्कालीन पोप जॉन पॉल दुसरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोप प्रान्सिस यांची भेट घेतली. भारत आणि व्हॅटिकन यांच्यातील मैत्रीची परंपरा जुनी असून या दोन देशांमध्ये 1948 सालापासून राजनैतिक संबंध प्रस्थापित झालेले आहेत. भारतात राहणाऱ्या कॅथोलिक लोकांची संख्या आशियातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात जास्त कॅथोलिक लोकसंख्या आहे.

या भेटीदरम्यान, दोन्ही नेत्यांनी कोविड-19 महामारीमुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि त्यामुळे जगभरातील लोकांना सोसाव्या लागणाऱ्या परिणामांबाबत चर्चा केली. यावेळी त्यांनी हवामान बदलामुळे समोर उभ्या ठाकलेल्या आव्हानांबद्दल देखील चर्चा केली. हवामान बदलाच्या परिणामांना तोंड देण्यासाठी भारताने केलेल्या उपाययोजनांबद्दल तसेच कोविड –19 प्रतिबंधक लसीच्या एक कोटी डोस देण्यात भारताने मिळविलेल्या सफलतेबाबत पंतप्रधानांनी पोप यांना थोडक्यात माहिती दिली. महामारीच्या काळात गरजू देशांना अनेक प्रकारे मदत केल्याबद्दल पोप यांनी भारताचे कौतुक केले.

महत्त्वाच्या बातम्या

Nvidia Spy Controversy : चीनवर निर्बंध आणण्यासाठी अमेरिका खोट्या कहाण्या रचतंय, एनव्हिडिया हेरगिरी वादावर चीनचा पलटवार
चीनवर निर्बंध आणण्यासाठी अमेरिका खोट्या कहाण्या रचतंय, एनव्हिडिया हेरगिरी वादावर चीनचा पलटवार
Nvidia :  एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा, चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं, जेनसेन हुआंगच्या अडचणीत वाढ
एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा, चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं
पाकिस्तानात पोलिसांच्या पथकावर मोठा दहशतवादी हल्ला, 11 पोलीसांचा जागीच मृत्यू, तर 12 जण जखमी
पाकिस्तानात पोलिसांच्या पथकावर मोठा दहशतवादी हल्ला, 11 पोलीसांचा जागीच मृत्यू, तर 12 जण जखमी
Nvidia CEO Jensen Huang and Alice Huang: अमेरिकेच्या बड्या टेक कंपनीच्या CEO चं चिनी गुप्तहेर महिलेसोबत लफडं कसं बाहेर आलं, जगाचं लक्ष का?
अमेरिकेच्या बड्या टेक कंपनीच्या CEO चं चिनी गुप्तहेर महिलेसोबत लफडं कसं बाहेर आलं, जगाचं लक्ष का?

व्हिडीओ

Satej Patil Coffee With Kaushik: शांत झालेल्या गोकुळमध्ये पवारांची एन्ट्री, सतेज पाटलांचे गौप्यस्फोट
Sanjay Raut PC : शरद पवार गट चर्चेलाच तयार नाही, मग सुनेत्रा पवार विलीनीकरण कोणासोबत करणार?
Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा
NCP Crisis : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलीनीकरणावरून चार वेगवेगळे मतप्रवाह
Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MPSC पेपरफुटीसंदर्भात तक्रार, निवेदनं करण्यास मुदतवाढ; दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे चौकशी समितीचा निर्णय
MPSC पेपरफुटीसंदर्भात तक्रार, निवेदनं करण्यास मुदतवाढ; दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे चौकशी समितीचा निर्णय
Gold Rate Weekly Update : सोन्याच्या दरातील घसरणीचा ट्रेंड कायम, पाच दिवसात सोनं 5000 रुपयांनी स्वस्त, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर IBJA कडून जारी
सोन्याच्या दरातील घसरणीचा ट्रेंड कायम, पाच दिवसात सोनं 5000 रुपयांनी स्वस्त, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर IBJA कडून जारी
Nvidia Spy Controversy : चीनवर निर्बंध आणण्यासाठी अमेरिका खोट्या कहाण्या रचतंय, एनव्हिडिया हेरगिरी वादावर चीनचा पलटवार
चीनवर निर्बंध आणण्यासाठी अमेरिका खोट्या कहाण्या रचतंय, एनव्हिडिया हेरगिरी वादावर चीनचा पलटवार
सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी झळ, दूध दरात प्रतिलिटर 4 रुपयांची वाढ; संघाच्या बैठकीत निर्णय, महागाईचं दिलं कारण
सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी झळ, दूध दरात प्रतिलिटर 4 रुपयांची वाढ; संघाच्या बैठकीत निर्णय, महागाईचं दिलं कारण
राहुल गांधींचा फोन टॅप हा आरोप नाही, वस्तुस्थिती; हर्षवर्धन सपकाळांची टीका, संजय राऊतांचाही मोदी-शाहांवर हल्लाबोल
राहुल गांधींचा फोन टॅप हा आरोप नाही, वस्तुस्थिती; हर्षवर्धन सपकाळांची टीका, संजय राऊतांचाही मोदी-शाहांवर हल्लाबोल
शेतात सोन्याचे सात हांडे पुरल्याची बतावणी; जालन्यात मांत्रिकासह नऊ जणांना अटक, अघोरी पुजेचं साहित्यही जप्त
शेतात सोन्याचे सात हांडे पुरल्याची बतावणी; जालन्यात मांत्रिकासह नऊ जणांना अटक, अघोरी पुजेचं साहित्यही जप्त
Pune Crime News: आळंदीत दिवसाढवळ्या थरार; भरवस्तीत तरुणावर धारदार कोयत्याने जीवघेणा हल्ला, घटनेचा व्हिडिओ समोर, नेमकं काय घडलं?
आळंदीत दिवसाढवळ्या थरार; भरवस्तीत तरुणावर धारदार कोयत्याने जीवघेणा हल्ला, घटनेचा व्हिडिओ समोर, नेमकं काय घडलं?
Home Loan : डिसेंबरमध्ये गृहकर्ज आणखी महागणार? आरबीआयनं रेपो रेट वाढवल्यास नवं घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना धक्का बसण्याची शक्यता, तज्ज्ञांचा अंदाज काय?
डिसेंबरमध्ये गृहकर्ज आणखी महागणार? आरबीआयनं रेपो रेट वाढवल्यास नवं घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना धक्का बसण्याची शक्यता
Embed widget