Pakistan : पाकिस्तानच्या निवडणुका पूर्ण झाल्यानंतरही ( Pakistan General Elections) पंतप्रधान कोण होणार? हे निश्चित झालेलं नाही. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान मुस्लिम लीग (एन) चे प्रमुख नवाझ शरीफ केंद्रात सरकार स्थापन करणार नसल्याची चर्चा आहे. नवाज आणि शाहबाज शरीफ यांच्यात आघाडी सरकारबाबत चर्चा झाली आहे. आघाडी सरकारच्या नियोजनाने दोन्ही नेते सरकार स्थापन करण्याच्या मनस्थितीत नसल्याचे दिसत आहे. सीएनएन-न्यूज 18 च्या रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आला आहे. सरकार बनवण्यात आणि पाडण्यात पाकिस्तानी लष्कर आणि गुप्तचर संस्था ISI यांची मोठी भूमिका असल्याचं सांगण्यात येत आहे.


निवडणुकीनंतर नवाझ शरीफ यांनी जबाबदारी दिली


8 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर 9 फेब्रुवारी रोजी, नवाझ शरीफ यांनी त्यांचे धाकटे बंधू आणि माजी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्याकडे सरकार स्थापनेचे नियोजन करण्याची जबाबदारी सोपवली होती. त्यांनी शेहबाज शरीफ यांना पाकिस्तान पीपल्स पार्टी, मुत्ताहिदा कौमी मूव्हमेंट-पाकिस्तान आणि जमात-उल-इस्लामी (फझल) यांच्यासोबत आघाडी सरकार स्थापन करण्यासाठी बैठका घेऊन सरकार स्थापनेची योजना आखण्याची सूचना केली होती.


'पीटीआयला पाकिस्तानी लष्करामुळे पराभवाला सामोरे जावे लागले'


अलीकडेच जमात-उल-इस्लामीच्या (फजल) अमीर फजल-उर-रहमान यांनी पाकिस्तानी मीडियाला दिलेल्या मुलाखतीत दावा केला होता की, पाकिस्तानी लष्करामुळे पीटीआयला निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. पाकिस्तानी लष्करानेच मला आणि नवाझ शरीफ यांना नॅशनल असेंब्लीत विरोधी पक्षात बसण्यास सांगितले आहे, असे त्यांनी मुलाखतीत सांगितले.


अमीर फजल-उर-रहमान यांच्या या मुलाखतीनंतर नवाज यांना वाटते की, सर्वाधिक जागा जिंकूनही केंद्रात आघाडीचे सरकार बनवणे योग्य नाही. पाकिस्तानात लष्कराच्या विरोधात जाणे शक्य नाही. CNN-News18 च्या वृत्तानुसार, या आठवड्याच्या सुरुवातीला शहबाज यांना पंतप्रधानपदासाठी नामांकन देऊनही, नवाज यांना आता वाटते की नॅशनल असेंब्लीमध्ये विरोधी पक्षात बसणे चांगले आहे.


आयएसआयने इम्रानविरोधात कट रचला होता


पाकिस्तानची गुप्तचर संस्था इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजेंस म्हणजेच आयएसआयच्या प्रतिनिधींनी अदियाला तुरुंगात इम्रान खान यांची भेट घेतल्याचेही अहवालात म्हटले आहे. या बैठकीनंतर एक करार झाला, त्यानंतर इम्रानने उमर अयुब खान यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नियुक्त केले. उमर अयुब हे पीटीआयचे सरचिटणीसही आहेत.


पाकिस्तानी मीडियाला दिलेल्या JUI-F प्रमुखच्या मुलाखतीनंतर पाकिस्तान डेमोक्रॅटिक मूव्हमेंट (PDM) आघाडीमध्ये तेढ निर्माण झाल्याचा दावा केला जात आहे. पाकिस्तान डेमोक्रॅटिक मूव्हमेंट अलायन्सने अविश्वास ठरावाच्या मतदानात इम्रान खान यांना सत्तेवरून हटवल्यानंतर सरकारची सूत्रे हाती घेतली.


पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांनीही विशेष सूचना दिल्या


पाकिस्तानी मीडियाला दिलेल्या मुलाखतीत JUI-F नुसार, माजी ISI प्रमुख फैज हमीद यांनी त्यांना इम्रान खानविरोधातील अविश्वास प्रस्तावाला पाठिंबा देण्यास सांगितले होते.


पाकिस्तानचे तत्कालीन लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी फैज हमीद यांच्यासह पाकिस्तानच्या राजकीय पक्षांना इम्रान खान यांना सत्तेवरून हटवण्याचे निर्देश दिल्याचा दावाही त्यांनी या मुलाखतीत केला होता. मी बाजूने नव्हतो, पण मी त्याला पाठिंबा दिला होता, कारण मी सूचनांच्या विरोधात गेलो असतो, तर मी इम्रान खानला वाचवले, असे पाकिस्तानी डेमोक्रॅटिक मूव्हमेंटने म्हटले असते, असे फजल म्हणाले.


इतर महत्वाच्या बातम्या