Alexei Navalny dead : रशियात (Russia) विरोधकांना सपवण्याचा एककलमी कार्यक्रम सुरुच असून आता तुरुंगात असलेल्या रशियन विरोधी पक्षनेते अलेक्सी नवलनी (Alexei Navalny) यांचा मृत्यू झाला आहे. यामालो-नेनेट्स प्रदेशाच्या तुरुंग सेवेचा हवाला देऊन रॉयटर्स वृत्तसंस्थेनं या बातमीला दुजोरा दिला आहे. नवलनी हे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांचे कट्टर विरोधक मानले जात होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शुक्रवारी जेव्हा नवल्नी तुरुंगात फिरत होते तेव्हा त्यांची प्रकृती ठीक नव्हती. त्यांनी याबाबत अधिकाऱ्यांना माहिती दिल्याने ते बेशुद्ध झाले. वैद्यकीय कर्मचाऱ्यांना तातडीने पाचारण करण्यात आले. पण त्यांनी शुद्ध आली नाही. नवलनींचा मृत्यू कशामुळे झाला? सध्या त्याची नेमकी माहिती समोर आलेली नाही.


सातत्याने त्यांच्या मृत्यूची अफवा


नवलनींबद्दल अफवा पसरली होती की 2020 मध्ये सायबेरियामध्ये त्यांना विष देऊन ठार मारण्यात आले होते. मात्र, रशियन सरकारने हे विधान निव्वळ अफवा असल्याचे म्हटले होते. त्यांना नर्व्ह एजंटने विषबाधा झाल्याचा कोणताही पुरावा नाही, असे सरकारकडून निवेदनात म्हटले आहे. एवढेच नाही तर तुरुंगातून ते बेपत्ता झाल्याची अफवाही पसरली होती.


गेल्यावर्षी शिक्षेत 19 वर्षांनी वाढ 


गेल्या वर्षी नवलनींची शिक्षा 19 वर्षांपर्यंत वाढवण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) पोस्ट करत मी नाही, तुम्ही घाबरले आहात आणि विरोध करण्याची इच्छाशक्ती गमावत आहात. निषेध करण्याची तुमची इच्छाशक्ती गमावू नका. विशेष शासन वसाहतीत 19 वर्षे. या आकड्याला काही अर्थ नाही. मला पूर्णपणे समजले आहे की, अनेक राजकीय कैद्यांप्रमाणेच माझी शिक्षा ही जन्मठेपेची आहे. पॅरोलचे उल्लंघन, फसवणूक आणि न्यायालयाचा अवमान अशा अनेक प्रकरणांमध्ये नवलनींवर आरोप करण्यात आला होता. 


नवलनी पुतिन यांचे कट्टर विरोधक 


नवलनी हे रशियाचे विद्यमान अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे कट्टर विरोधक मानले जात होते. त्यामुळे त्यांना अनेकवेळा तुरुंगवास भोगावा लागला. 2011 मध्ये त्यांनी पुतिन यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते आणि चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर त्यांना 15 दिवस तुरुंगात टाकण्यात आले. 2013 मध्ये त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात आले होते. त्यामुळे त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला होता. मात्र, प्रत्येक वेळी त्यांनी स्वत:ला निर्दोष घोषित केले.


इतर महत्वाच्या बातम्या