PM Modi President Putin Moscow Meet: पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या दोन दिवसीय रशिया दौऱ्यावर असून सोमवारी संध्याकाळी ते मॉस्को शहरात पोहोचले. यावेळी पंतप्रधान मोदींचे जोरदार स्वागत करण्यात आले. रशिया युक्रेन युद्धानंतरचा पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच दौरा आहे. पंतप्रधान जेंव्हा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या अधिकृत निवासस्थानी पोहोचले तेंव्हा राष्ट्राध्यक्ष पुतिन त्यांच्या स्वागतासाठी तिथे आधीच उभे होते. पीएम मोदी कारमधून उतरताच त्यांनी प्रथम हस्तांदोलन करत त्यांना मिठी मारली आणि त्यांचे घनिष्ठ संबंध व्यक्त केले. मात्र, या संपूर्ण भेटीत एका महिलेने लक् वेधून घेतले. राष्ट्राध्यक्ष पुतीन आण पंतप्रधान मोदी यांच्या मागे सवलीसारखी चालत असणारी ही महिला कोण आहे? पाहूया..
पंतप्रधान मोदी- राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या मागे असणारी महिला कोण?
शिखर परिषदेसाठी रवाना झालेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन त्यांच्या मातृभाषेतच बोलणे पसंत करतात. सोमवारी एका खासगी डिनरदरम्यान पंतप्रधान मोंदींसोबतत झालेल्या भेटीत राष्ट्राध्यक्ष पुतिन रशियन भाषेत बोलताना दिसले आणि पंतप्रधान मोदी हिंदीत बोलताना दिसले. अशा परिस्थितीत एकमेकांना समजून घेण्यासाठी दोन्ही देशांतून दूभाषकांचे नेमणूक करण्यात येते. ही मागे चालणारी महिला त्यापैकीच एक होती. काळ्या रंगांच्या कपड्यात असलेली ही महिला रशियाकडून नेमण्यात आलेली दुभाषक होती. राष्ट्राध्यक्ष पुतिन काय म्हणताहेत याचा अनुवाद ती करत होती. यावेळी भारताकडून नेमण्यात आलेला दुभाषकही उपस्थित होता.
पंतप्रधानांच्या कामाचे पुतिन यांच्याकडून कौतूक
यावेळी पुतिन यांच्या निवासस्थानी झालेल्या या अनौपचारिक बैठकीत राष्ट्रपती पुतिन यांनी भारताच्या प्रगतीसाठी केलेल्या कामाबद्दल पंतप्रधान मोदींचे कौतुक केले. ते मोदींना म्हणाले, "पुन्हा पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल मला तुमचे अभिनंदन करायचे आहे. मला वाटतं हा योगायोग नसून तुमच्या अनेक वर्षांच्या कामाचा परिणाम आहे. पंतप्रधान मोदींनी आपले संपूर्ण आयुष्य आपल्या लोकांसाठी समर्पित केले आहे लोकांनाही ते जाणवू शकते," असेही ते म्हणाले.
शिखर परिषदेत चर्चेसाठी उत्सूक- पंतप्रधान मोदी
दुसरीकडे नोबो ओगार्योवो (रशियन राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान ) येथे पंतप्रधान मोदींनी राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचे यजमान पदासाठी आभार व्यक्त केले. एक्स या समाज माध्यमावर त्यांनी केलेल्या एका पोस्टमध्ये म्हटले आहे की , "आम्ही उद्याच्या चर्चेची आतुरतेने वाट पाहत आहोत जे रशिया आणि भारतातील मैत्रीचे बंध अधिक दृढ करण्यासाठी निश्चितच महत्त्वपूर्ण ठरतील."
युक्रेन आणि रशियामधील युद्धानंतर पहिल्यांदाच रशियात पोहोचलेले पंतप्रधान मोदी मंगळवारी रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांच्याशी शिखर परिषदेत चर्चा करणार आहेत. या भेटीकडे एक व्यापक भूराजकीय संबंध आणि संकेत म्हणून पाहिले जात आहे.