एक्स्प्लोर

PM Narendra Modi on Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांच्या डिनर प्रोग्राममध्ये गोळीबार; भारताची पहिली प्रतिक्रिया, पीएम मोदी म्हणाले, 'लोकशाहीत हिंसेला...'

PM Narendra Modi on Donald Trump: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उपस्थित असलेल्या वॉशिंग्टनमधील हिल्टन हॉटेलमधील एका कार्यक्रमात शनिवारी रात्री गोळीबाराची धक्कादायक घटना घडली.

PM Narendra Modi on Donald Trump: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) उपस्थित असलेल्या वॉशिंग्टनमधील हिल्टन हॉटेलमधील एका कार्यक्रमात शनिवारी रात्री गोळीबाराची धक्कादायक घटना घडली. 'व्हाईट हाऊस कॉरस्पॉन्डंट्स डिनर' सुरू असताना मोठे आवाज ऐकू आले, ज्यामुळे एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत भारताची भूमिका स्पष्ट केली असून ट्रम्प यांच्या सुरक्षेबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

PM Narendra Modi on Donald Trump: पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया

या घटनेवर प्रतिक्रिया देताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, "राष्ट्राध्यक्ष ट्रम्प, फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प (Melania Trump) आणि उपराष्ट्रपती हे वॉशिंग्टन डीसीमधील घटनेनंतर सुरक्षित आहेत, हे जाणून समाधान वाटले. मी त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा देतो. लोकशाहीत हिंसेला कोणतंही स्थान नाही आणि अशा कृत्यांचा पूर्णपणे निषेध केला पाहिजे," असे त्यांनी म्हटले. 

Donald Trump: नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री वॉशिंग्टनच्या हिल्टन हॉटेलमध्ये रात्रीच्या जेवणाचा कार्यक्रम सुरू होता. यावेळी अचानक मोठे आवाज झाले. सुरक्षेचा धोका ओळखून 'सीक्रेट सर्व्हिस'च्या अधिकाऱ्यांनी तात्काळ डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलानिया ट्रम्प यांना सुरक्षित ठिकाणी हलवले. सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत एका सशस्त्र संशयित हल्लेखोराला गोळ्या घालून ठार करण्यात आले असून दुसऱ्या एका संशयिताला ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती आहे.

Donald Trump: ट्रम्प यांनी घेतली पत्रकार परिषद

या हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकार परिषद घेऊन सुरक्षा दलांच्या तत्परतेचे कौतुक केले. ट्रम्प म्हणाले, "हा हल्ला अनपेक्षित होता, मात्र सीक्रेट सर्व्हिसने अतिशय वेगाने कारवाई केली. एका सशस्त्र व्यक्तीने सुरक्षा चौकीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, पण आमच्या शूर जवानांनी त्याला रोखले. या घटनेत एका सुरक्षा अधिकाऱ्याला जवळून गोळी लागली, मात्र बुलेटप्रूफ जॅकेटमुळे त्याचे प्राण वाचले." ट्रम्प यांनी या घटनेचा व्हिडिओ सार्वजनिक करण्याचे आदेशही दिले आहेत. या घटनेमुळे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

आणखी वाचा 

Donald Trump : एकदा नाही, दोनदा नाही तर तब्बल 9 वेळा डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरती हल्ला; कानाला गोळी लागती तर कधी विषारी रसायन पाठवून....; प्रत्येक वेळी निघाले सुखरूप

 

महत्त्वाच्या बातम्या

'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
Cyberattack on Refrigeration: फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका
फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका, अनेक दुकानांमध्येही आगीचा भडका
Breaking Bad Fame RJ Mitte Dies: मनी हाईस्टपेक्षा कितीतरी पटींनी भारी असणाऱ्या वेब सीरिजच्या सुपरस्टार अभिनेत्याचं निधन; स्वतःच आयुष्य संपवल्याच्या चर्चांना उधाण
मनी हाईस्टपेक्षा कितीतरी पटींनी भारी असणाऱ्या वेब सीरिजच्या सुपरस्टार अभिनेत्याचं निधन; स्वतःच आयुष्य संपवल्याच्या चर्चांना उधाण
Parking Space Controversy : अजबच! महिलेने 20 कोटींत खरेदी केले 196 पार्किंग स्पेस; नंतर पार्किंगसाठी उकळली मनमानी भाडेवसुली, सगळेच हतबल
अजबच! महिलेने 20 कोटींत खरेदी केले 196 पार्किंग स्पेस; नंतर पार्किंगसाठी उकळली मनमानी भाडेवसुली, सगळेच हतबल

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patekar Condolence Meet Jaywant Wadkar: नाना पाटेकरांच्या शोकसभेत जयवंत वाडकरांकडे सगळे पाहतच राहिले, खुर्चीवर न बसता जमिनीवर बसले, नेमकं काय घडलं? VIDEO
नाना पाटेकरांच्या शोकसभेत जयवंत वाडकरांकडे सगळे पाहतच राहिले, खुर्चीवर न बसता जमिनीवर बसले, नेमकं काय घडलं? VIDEO
Solapur Crime News: पोटच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाच्या बायकोला आईनं दिली ऑफर; 39 लाखांची मागणी अन् आरोपातून मुक्तता..., सोलापुरात नेमकं काय घडलं?
पोटच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाच्या बायकोला आईनं दिली ऑफर; 39 लाखांची मागणी अन् आरोपातून मुक्तता..., सोलापुरात नेमकं काय घडलं?
'ते गोव्याला जाण्यापूर्वी…', नाना पाटेकरांची 'ती' शेवटची इच्छा अपूर्णच... सच्चा दोस्त गमावल्यानं मकरंद अनासपुरे भावूक, आठवणी सांगताना म्हणाले...
'ते गोव्याला जाण्यापूर्वी…', नाना पाटेकरांची 'ती' शेवटची इच्छा अपूर्णच... सच्चा दोस्त गमावल्यानं मकरंद अनासपुरे भावूक, आठवणी सांगताना म्हणाले...
Maharashtra Live blog updates: ठाणे जिल्ह्याची भविष्यातील तहान भागवणारे काळू धरण प्रकल्पावरील 10 वर्षांची स्थगिती उठवली
Maharashtra Live blog updates: ठाणे जिल्ह्याची भविष्यातील तहान भागवणारे काळू धरण प्रकल्पावरील 10 वर्षांची स्थगिती उठवली
Railway Bonus :रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
Smriti Irani On Rahul Gandhi : 'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
Rahul Gandhi Vs Election Commission : ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
JIO IPO :जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड आयपीओद्वारे 27 कोटी शेअर जारी करणार, जिओचा IPO 'या' तारखेला खुला होणार
भारतातील सर्वात मोठा आयपीओ 'या' तारखेला खुला होणार, जिओच्या IPO संदर्भात मोठी अपडेट समोर
Embed widget