एक्स्प्लोर

पंतप्रधान मोदींच्या हस्ते अबुधाबीत पहिल्या हिंदू मंदिराचं भूमिपूजन

अबुधाबी येथील हिंदू मंदिराच्या पायाभरणीचा सोहळा पार पडल्यानंतर मोदींनी भारतीय समुदायाशी संवाद साधला.

अबुधाबी : भारतात 70 वर्षांपासून सुरु असलेली व्यवस्था बदलण्यास थोडा कालावधी जाईल, मात्र बदल नक्की घडून येतील, असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अबुधाबीत केलं आहे. अबुधाबी येथील पहिल्या हिंदू मंदिराचं भूमिपूजन मोदींच्या हस्ते करण्यात आलं. अबुधाबीत भारतीय समुदायासमोर आपलं मनोगत व्यक्त करताना मोदींनी जीएसटी, नोटबंदी आणि इतर मुद्द्यांवर आपलं सरकार प्रामाणिकपणे काम करत असल्याचं सांगितलं. आपल्या सरकारने घेतलेले प्रत्येक निर्णय हे सामन्य माणसाच्या हिताचे होते आणि त्या निर्णयांच्या बाजूने सामन्य माणूस उभाही राहिला. मात्र विरोधक अजूनही नोटाबंदीचा धक्का पचवू शकले नसल्याचं म्हणत मोदींनी काँग्रेसला पुन्हा एकदा लक्ष्य केलं. तुम्ही पाहत असलेलं स्वप्न एक दिवस नक्की प्रत्यक्षात अवतरेल, अशी हमी मोदींनी भारतीयांना दिली. संयुक्त अरब अमिरातीत दोन दिवसांच्या दौऱ्यावर असलेल्या मोदींनी अनेक करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. पंतप्रधान झाल्यानंतर मोदींचा हा दुसरा यूएई दौरा आहे. यापूर्वी 2015 मध्ये ते संयुक्त अरब अमिरातीत गेले होते. अबुधाबी येथील हिंदू मंदिराच्या पायाभरणीचा सोहळा पार पडल्यानंतर मोदींनी भारतीय समुदायाशी संवाद साधला. सव्वाशे कोटी भारतीयांच्या वतीने मोदींनी वली अहद शहजादा मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांचे आभार व्यक्त केले. 'हे हिंदू मंदिर फक्त वास्तुकला आणि भव्यतेच्या दृष्टीनेच अद्भूत नसेल, तर यातून वसुधैव कुटुंबकम हा संदेशही अख्ख्या जगाला मिळेल.' असा विश्वासही पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला. 50 हजार चौरस मीटर जागेवर अबुधाबीत पहिलं हिंदू मंदिर तयार होणार आहे. भारतीय शिल्पकार याची रचना करत असून 2020 पर्यंत मंदिर बांधून पूर्ण होईल. सर्वधर्मीयांसाठी हे मंदिर खुलं असेल, असंही मोदींनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या

भारत आणि पाकिस्तानमधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी आणि शहबाज यांना पत्र; म्हणाले, 'वैर संपवा आणि संवाद, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करा..'
भारत आणि पाकिस्तानमधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी आणि शहबाज यांना पत्र; म्हणाले, 'वैर संपवा आणि संवाद, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करा..'
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलनाचा भडका, लोकांचा नारा, 'तुमच्या रेशनची आम्हाला गरज नाही, आम्ही पाकिस्तानचा भाग नाही' 1 कोटींचे बक्षीस ठेवलेल्या शौकत नवाज यांना अटक
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलनाचा भडका, लोकांचा नारा, 'तुमच्या रेशनची आम्हाला गरज नाही, आम्ही पाकिस्तानचा भाग नाही' 1 कोटींचे बक्षीस ठेवलेल्या शौकत नवाज यांना अटक
'देशात जन्मलेलं प्रत्येक मूल अमेरिकन नागरिक..' अमेरिकेत जन्मसिद्ध नागरिकत्व कायदा कायम, सुप्रीम कोर्टाकडून ट्रम्पचा आदेश रद्द, लाखो भारतीयांना दिलासा
'देशात जन्मलेलं प्रत्येक मूल अमेरिकन नागरिक..' अमेरिकेत जन्मसिद्ध नागरिकत्व कायदा कायम, सुप्रीम कोर्टाकडून ट्रम्पचा आदेश रद्द, लाखो भारतीयांना दिलासा
युरोपमधील उष्णतेच्या लाटेमुळे भारतीय एसी निर्यातदारांवर जगाचे लक्ष केंद्रित; उत्पादकांना संधी, ग्राहकांना पर्याय
युरोपमधील उष्णतेच्या लाटेमुळे भारतीय एसी निर्यातदारांवर जगाचे लक्ष केंद्रित; उत्पादकांना संधी, ग्राहकांना पर्याय

व्हिडीओ

Gold-Silver Price Today : जुलैच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी स्वस्त; जाणून घ्या आजचे नवे दर!
Zero Hour Full : खासदार, आमदारांच्या फुटीनंतर आता ठाकरेंनी आत्मचिंतन करायला हवं असं वाटतं का?
Uddhav Thackeray Special Report : ऑपरेशन टायगरनंतर उद्धव ठाकरे आत्मचिंतन करणार?
Raj Thackeray Special Report : फोडाफोडी, ऑपरेशनवर राज ठाकरेंची टीका, भाजपला इशारा
Satej Patil on Sachin Ahir : सचिन अहिर फुटले, आता सतेज पाटील म्हणतात...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संतापजनक! चुकीच्या उपचारामुळे महिलेचा मृत्यू, पोटातील बाळही दगावले; नातेवाईकांचा रुग्णालयातच आक्रोश
संतापजनक! चुकीच्या उपचारामुळे महिलेचा मृत्यू, पोटातील बाळही दगावले; नातेवाईकांचा रुग्णालयातच आक्रोश
श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले, उद्धव ठाकरेंची शिवसैनिकांना शाबासकी;फोनवरुन म्हणाले, तुमच्यासारख्या..
श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले, उद्धव ठाकरेंची शिवसैनिकांना शाबासकी;फोनवरुन म्हणाले, तुमच्यासारख्या..
मोठी बातमी! कोल्हापूरच्या चंदगडमध्ये 55 गावांचा हेरे सरंजाम प्रश्न कायमस्वरूपी निकाली, 22 हजार कुटुंबाना मालकी हक्क
मोठी बातमी! कोल्हापूरच्या चंदगडमध्ये 55 गावांचा हेरे सरंजाम प्रश्न कायमस्वरूपी निकाली, 22 हजार कुटुंबाना मालकी हक्क
Rain Update: पुण्यातील बाजीराव रोडवर झाडपडी; मुंबईतही कारवर कोसळलं झाड, पुढील 3 दिवस पावसाचा जोर कायम
पुण्यातील बाजीराव रोडवर झाडपडी; मुंबईतही कारवर कोसळलं झाड, पुढील 3 दिवस पावसाचा जोर कायम
भारत आणि पाकिस्तानमधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी आणि शहबाज यांना पत्र; म्हणाले, 'वैर संपवा आणि संवाद, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करा..'
भारत आणि पाकिस्तानमधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी आणि शहबाज यांना पत्र; म्हणाले, 'वैर संपवा आणि संवाद, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करा..'
मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, उद्या 2 जुलै रोजी शाळेला सुट्टी
मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, उद्या 2 जुलै रोजी शाळेला सुट्टी
वायरी उघड्या, स्कुटीवरुन जाणाऱ्या दोन मुलींना करंट, रस्त्यावरच कोसळल्या; पावसाच्या पाण्यात 5 वाहने गेली वाहून
वायरी उघड्या, स्कुटीवरुन जाणाऱ्या दोन मुलींना करंट, रस्त्यावरच कोसळल्या; पावसाच्या पाण्यात 5 वाहने गेली वाहून
राज ठाकरेंच्या वक्तव्यावरुन हक्कभंग होऊ शकतो; फोडाफोडीचं राजकारण तापलं, राम कदमांचा मनसेप्रमुखांना इशारा
राज ठाकरेंच्या वक्तव्यावरुन हक्कभंग होऊ शकतो; फोडाफोडीचं राजकारण तापलं, राम कदमांचा मनसेप्रमुखांना इशारा
Embed widget