एक्स्प्लोर

G-20 : ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांचा मोदींसोबत सेल्फी, भन्नाट शब्दात केलं मोदींचं कौतुक

दरम्यान आज मोदींनी इंडोनेशिया, ब्राझील, तुर्की, ऑस्ट्रेलिया,सिंगापूर आणि चिलीच्या नेत्यांसोबत वेगवेगळ्या बैठका घेतल्या. यामध्ये त्यांनी व्यापार, दहशतवाद, समुद्र सुरक्षा, आणि खेळ अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा केली.

ओसाका :देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी जी-२० शिखर संमेलनातून आज भारतात परतले. आज संमेलनाच्या शेवटच्या दिवशी त्यांनी विविध देशांच्या प्रमुखांसोबत विविध विषयांवर चर्चा केली. यामध्ये विशेष आकर्षणाचं केंद्र ठरला तो ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी मोदींसोबत घेतलेला सेल्फी. पंतप्रधान नरेंद्र मोदींची ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्यासोबत बैठक झाली. यावेळी भारत आणि ऑस्ट्रेलियामधील संबंधांवर दोघांनीही चर्चा केली. या भेटीनंतर मॉरिसन यांनी ट्विटरवर पंतप्रधान मोदींसोबतचा एक सेल्फी शेअर केला. सेल्फी शेअर करताना त्यांनी 'कितना अच्छा है मोदी' अर्थात 'मोदी किती चांगले आहेत' असे कॅप्शन दिले आहे. याच ट्वीटला रिट्विट करताना मोदींनी ' मित्र,  मी आपल्या दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांमधील ऊर्जेविषयी विचार करत आहे' असे म्हटले आहे. यावर प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. दरम्यान आज मोदींनी इंडोनेशिया, ब्राझील, तुर्की, ऑस्ट्रेलिया,सिंगापूर आणि चिलीच्या नेत्यांसोबत वेगवेगळ्या बैठका घेतल्या. यामध्ये त्यांनी व्यापार, दहशतवाद, समुद्र सुरक्षा, आणि खेळ अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा केली. जी-20 शिखर संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी मोदींनी भारत-इंडोनेशियामधील संबंध घनिष्ट करण्याच्या दृष्टीने राष्ट्रपती जोकोवि (जोको विडोडो) यांच्याशी विस्तृत चर्चा केली. व्यापार,गुंतवणूक, अंतराळ क्षेत्र अशा क्षेत्रांमध्ये एकमेकांना सहकार्याबाबत चर्चा करण्यात आली. शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, जपानचे पंतप्रधान शिंजो आबे, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि चिनी अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासारख्या जागतिक नेत्यांच्या द्विपक्षीय आणि त्रिपक्षीय बैठक केली होती. यामध्ये त्यांनी व्यापार, विकास आणि दहशतवाद या विषयावर चर्चा केली होती. यावेळी  नरेंद्र मोदी यांनी दहशतवाद हा जगासाठी एक धोका आहे. दहशतवादाला समूळ नष्ट करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे म्हटले होते.  तसेच यावेळी मोदींनी दहशतवादाच्या मुद्द्यावर जागतिक परिषदेचीही मागणी केली.

महत्त्वाच्या बातम्या

'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
Cyberattack on Refrigeration: फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका
फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका, अनेक दुकानांमध्येही आगीचा भडका
Breaking Bad Fame RJ Mitte Dies: मनी हाईस्टपेक्षा कितीतरी पटींनी भारी असणाऱ्या वेब सीरिजच्या सुपरस्टार अभिनेत्याचं निधन; स्वतःच आयुष्य संपवल्याच्या चर्चांना उधाण
मनी हाईस्टपेक्षा कितीतरी पटींनी भारी असणाऱ्या वेब सीरिजच्या सुपरस्टार अभिनेत्याचं निधन; स्वतःच आयुष्य संपवल्याच्या चर्चांना उधाण
Parking Space Controversy : अजबच! महिलेने 20 कोटींत खरेदी केले 196 पार्किंग स्पेस; नंतर पार्किंगसाठी उकळली मनमानी भाडेवसुली, सगळेच हतबल
अजबच! महिलेने 20 कोटींत खरेदी केले 196 पार्किंग स्पेस; नंतर पार्किंगसाठी उकळली मनमानी भाडेवसुली, सगळेच हतबल

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Smriti Irani On Rahul Gandhi : 'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
Rahul Gandhi Vs Election Commission : ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
JIO IPO :जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड आयपीओद्वारे 27 कोटी शेअर जारी करणार, जिओचा IPO 'या' तारखेला खुला होणार
भारतातील सर्वात मोठा आयपीओ 'या' तारखेला खुला होणार, जिओच्या IPO संदर्भात मोठी अपडेट समोर
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
Dhruv Rathee : आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
प्रत्येक रेल्वे तिकिटावर विमा सुविधा देणं बंधनकारक, सुप्रीम कोर्टाचे भारतीय रेल्वेला आदेश, 27 ऑक्टोबरपासून नवा नियम लागू होणार
मोठी बातमी, रेल्वे काऊंटरवरुन खरेदी केलेल्या तिकिटाला विमा सुविधा द्या, सुप्रीम कोर्टाचे आदेश
Mhada Pune Lottery : पुणेकरांसाठी गुड न्यूज, म्हाडाच्या 4462 घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, 'या' तारखेपर्यंत अर्ज करण्याची संधी
पुणेकरांसाठी गुड न्यूज, म्हाडाच्या 4462 घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, 'या' तारखेपर्यंत अर्ज करण्याची संधी
Embed widget