PM Modi Dubai Visit :  पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे त्यांचा फ्रान्सचा दौरा झाल्यानंतर शनिवारी (15 जुलै) रोजी संयुक्त अरब अमिरातच्या (UAE) दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी युएईचे राष्ट्रपती शेख बिन जायद यांची भेट घेतली आणि त्यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक देखील केली. या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली आहे. राष्ट्रपतींच्या भेटीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की, 'अबुधाबीला आल्यानंतर राष्ट्रपतींची भेट घेऊन आनंद झाला. तसचे युएईच्या राष्ट्रपतींनी केलेल्या स्वागतासाठी पंतप्रधान मोदींनी त्यांचे आभार मानले आहेत.' 


पुढे बोलतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की, 'आम्ही दोन्ही देशांच्या संबंधांना आणखी दृढ करण्यासाठी नव्या योजनांची आखणी केली आहे. तसेच या बैठकीमध्ये दोन्ही देशांच्या व्यापराला चालना देण्यासाठी देखील चर्चा करण्यात आल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.' 


तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या दौऱ्यामध्ये युएईचे राष्ट्राध्यक्ष शेख बिन जायद यांच्यामध्ये अनेक सामंजस्य करार करण्यात आल्याची माहिती भारत आणि युएईच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. 






IIT दिल्लीचे कॅम्पस अबुधाबीमध्ये


केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि अबू धाबीच्या शिक्षण मंत्रालयाने शनिवारी आयआयटी दिल्लीचे कॅम्पस स्थापन करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्याची माहिती शिक्षण मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) दिल्ली ही IIT मद्रास नंतर बाहेरील देशात IIT चा कॅम्पस स्थापन करणारी दुसरी संस्था आहे. आयआयटी मद्रासने टांझानियाच्या झांझिबारमध्ये कॅम्पस स्थापन करण्यासाठी सामंजस्य करार केला आहे.  


याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी COP28UAE चे अध्यक्ष डॉ. सुलतान अल जबर यांची भेट घेतली आहे. तसेच त्यांच्या भेटीमुळे अत्यंत आनंद झाल्याचं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करत या बैठकीबद्दल माहिती दिली आहे. पंतप्रधान मोदींनी यावेळी युएईचे राष्ट्रपती यांच्यासोबत उर्जा, अन्न सुरक्षा आणि सुरक्षा या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली असल्याची माहिती  मिळत आहे. 


हे ही वाचा : 


Rafale M Deal : चिनी ड्रॅगन अन् पाकिस्तानची झोप उडणार; भारतच समुद्राचा खरा 'बादशाह', नौदलात सामील होणार 26 राफेल-एम