Khalistan Supporters in Australia : कॅनडा (Canada), लंडन (London) नंतर आता ऑस्ट्रेलिया (Australia) मध्येही खलिस्तानी समर्थक पुन्हा एकदा आक्रमक होताना दिसत आहे. परदेशी भूमीवर खलिस्तान समर्थकांची आंदोलनं सुरुच आहेत. ऑस्ट्रेलियातील (Australia) सिडनी येथे खलिस्तान समर्थकांनी (Khalistan Supporters) एका भारतीय विद्यार्थ्याला (Indian Student) बेदम मारहाण केली. जखमी विद्यार्थ्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.


भारतीय विद्यार्थ्यावर खलिस्तानी समर्थकांचा हल्ला


ऑस्ट्रेलियामध्ये खलिस्तानी समर्थकांकडून (Khalistan Supporters) भारतीयांना लक्ष्य केलं जात आहे. शुक्रवारी ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय विद्यार्थ्यावर (Indian Student) प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. खलिस्तानी समर्थकांनी भारतीय विद्यार्थ्याला मारहाण केल्याची बातमी आहे. आस्ट्रेलियाच्या सिडनीमधील पश्चिमी उपनगर मेरीलँड्समध्ये खलिस्तानी समर्थकांनी एका भारतीय विद्यार्थ्यावर प्राणघातक हल्ला केला. त्यांनी भारतीय विद्यार्थ्याला रस्त्यावर लोखंडी सळीनं बेदम मारहाण केली.


ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये खलिस्तानींचा हल्ला


ऑस्ट्रेलिया टुडेच्या रिपोर्टनुसार, खलिस्तानी आंदोलनांविरोधात आवाज उठवल्यानंतर त्यांनी एका भारतीय विद्यार्थ्याला (Indian Student) लक्ष्य केलं. मीडिया रिपोर्टनुसार, ऑस्ट्रेलियामध्ये एका 23 वर्षीय विद्यार्थ्याला खलिस्तानी समर्थकांनी लोखंडी रॉडने मारहाण केल्याची माहिती आहे. खलिस्तानी समर्थकांवर आरोप आहे की, त्यांनी भारतीय विद्यार्थ्यावर लोखंडी सळीने हल्ला करत त्याला मारहाण केली. 


सिडनीच्या पश्चिम उपनगरातील मेरीलँड्समध्ये खलिस्तान समर्थकांनी केलेल्या हल्ल्यात एक भारतीय विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. जखमी विद्यार्थ्यावर वेस्टमीड रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा हल्ला झाला तेव्हा विद्यार्थी कामाला जाण्यासाठी निघाला होता.


नेमकी घटना काय?


ऑस्ट्रेलिया टुडेच्या रिपोर्टनुसार, विद्यार्थी ऑस्ट्रेलियामध्ये शिकत असून तो ड्रायव्हरचं कामही करतो. ही घटना शुक्रवारी सकाळी घडली, ज्यावेळी तो कामाला जाण्यासाठी निघाला होता. पीडित विद्यार्थ्याने सांगितलं की, ''मी पहाटे 5.30 वाजता कामावर जाण्यासाठी निघालो असताना, 4-5 खलिस्तानी समर्थकांनी हल्ला केला. मी विद्यार्थी असून ड्रायव्हर म्हणूनही काम करतो. मी राहतो त्या ठिकाणापासून माझी गाडी 50 मीटर अंतरावर होती. मी गाडीत बसल्यावर अचानक खलिस्तानींनी हल्ला केला. एकाने गाडीचा उजवा दरवाजा उघडला, दुसऱ्या व्यक्तीने मला उजव्या डोळ्याच्या खाली लोखंडी रॉडने हल्ला केला. त्यानंतर ड्रायव्हरच्या बाजूचा दरवाजा उघडून मला खाली ओढलं आणि लोखंडी सळीने बेदम मारहाण केली.''


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Khalistan Protest : कॅनडानंतर लंडनमध्येही खलिस्तान समर्थकांची हल्ल्याची तयारी, रॅलीच्या प्रचारासाठी सोशल मीडियाचा वापर; भारतीय राजदूतांना लक्ष्य