कझाकिस्तानमध्ये मोठी विमान दुर्घटना, 14 जणांचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 27 Dec 2019 09:59 AM (IST)
अल्माटी विमानतळावर टेक ऑफ करताना दोन मजल्याच्या एका इमारतीवर आदळल्यामुळे विमानाला अपघात झाला. घटनास्थळी सध्या बचावकार्य सुरू असून आपातकालीन सेवा पोहचवल्या जात आहेत.
नवी दिल्ली : कझाकिस्तानमध्ये एक मोठी विमान दुर्घटना घडली आहे. या अपघातात आतापर्यंत14 लोकांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. असं सांगितलं जात आहे की, दुर्घटनाग्रस्त विमान बेक एअरलाइन्सचं होतं आणि त्यामध्ये जवळपास 100 प्रवासी होते. अल्माटी विमानतळावर टेक ऑफ करताना दोन मजल्याच्या एका इमारतीवर आदळल्यामुळे विमानाला अपघात झाला. घटनास्थळी सध्या बचावकार्य सुरू असून आपातकालीन सेवा पोहचवल्या जात आहेत. अपघातानंतर विमानतळ रिकामं करण्यात आलं. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त विमान अल्माटीवरून देशाची राजधानी असलेलं सर्वात मोठं शहर नूर-सुल्तान येथे जात होतं. अल्माटी विमानतळावरून मिळालेल्या माहितीनुसार, विमानामध्ये 95 प्रवासी आणि एअरलाइन्सचे कर्मचारी सदस्य होते. अपघातानंतर घटनास्थळी सुरू असलेल्या बचाव कार्याचे फोटेज समोर आलं असून त्यामध्ये एक महिला एम्बुलेन्सला बोलावताना दिसत आहे. विमानाचं कॉकपिट इमारतीच्या किनाऱ्यावर दिसत आहे. माहितीनुसार, अपघाताची चौकशी करण्यासाठी एक विशेष समीती नेमण्यात आली आहे. बेक एअरलाइन्सची स्थापना 1999मध्ये झाली होती. ही कंपनी आपल्या VIP फ्लाइट ऑपरेशंससाठी ओळखली जाते. कंपनीच्या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, कझाकिस्तानची लो फेयर असणारी एअरलाइन्स असून यांची 100 विमानं आहेत. दरम्यान, हा शहरातील पहिला विमान अपघात नाही. 29 जानेवारी 2013 ला उत्तर कोकसेतौमध्येही एक विमान अपघात झाला होता. ज्यामध्ये 20 लोकांचा मृत्यू झाला होता. संबंधित बातम्या : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोग संमत, सीनेटमध्ये पुढील महिन्यात मतदान पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांना मृत्युदंडाची शिक्षा भारताने घुसखोर बांगलादेशींची यादी द्यावी, आम्ही त्यांना मायदेशी बोलावू : बांगलादेश वय वर्ष 34, फिनलॅण्डच्या सना मरिन जगातील सर्वात तरुण पंतप्रधान!