दरम्यान विमानाने पेट घेतल्यानंतर जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी अक्षरश: पेटत्या विमानातून उड्या मारल्या. विमानाला आग नेमक्या कोणत्या कारणामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
या विमानाने यशस्वी टेकऑफ केले. परंतु टेकऑफनंतर काहीच वेळात विमानात तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे पायलटने विमानाचे लॅण्डिंग करायचे ठरवले. विमान लॅण्ड करत असताना विमानाच्या इंजिनने पेट घेतला.
VIDEO
स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार विमानात एकूण 78 प्रवासी प्रवास करत होते. त्यापैकी 41 लोकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये लहान मुलांचादेखील समावेश आहे.
जळणाऱ्या विमानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे की, विमान लॅण्ड करत असताना हेलकावे खात होतं. त्यानंतर विमानाच्या इंजिनने पेट घेतला. विमान रनवेवर उतरुन धावत असताना लोक आपत्कालीन दरवाज्यामधून बाहेर उड्या मारत आहेत.