मुंबई: जगातील सर्वात लहान उंचीच्या वधू-वरांचा विवाह सोहळा गेल्याच आठवड्यात ब्राझीलमध्ये संपन्न झाला. जवळपास आठ वर्षांपासून सुरु असलेल्या यांच्या प्रेम संबंधांनंतर, त्यांनी विवाह बंधनात आडकण्याचा निर्णय घेतला. या दोघांचीही एकूण उंची पाच फूट १० इंच आहे.
आपल्या मित्रांच्या साथीने ३० वर्षीय पाऊलो गेब्रियल डे सिल्वा बारोसने ब्राझीलच्या दक्षिण पूर्व भागात राहणाऱ्या २७ वर्षीय काट्युसिया होशिनोला लग्नाचा प्रस्ताव दिला. पाउलोचा प्रस्ताव होशिनोला मान्य झाल्याने तिने लग्नाला होकार दिला.
होशिनाला संतती सुखापेक्षा आनंदात जीवन जगण्यासाठी जोडीदाराची गरज असल्याचे, तिने यावेळी सांगितले. या नव्य दाम्पत्याची नोंद सारे जग घेईल, अशी या दोघांनाही आशा आहे.