दुबई : विमान अपघातात थोडक्यात बचावलेल्या 62 वर्षीय भारतीयाला सुदैवाने आयुष्याची लॉटरी लागलीच मात्र प्रत्यक्षातही 10 लाख डॉलरची लॉटरीही लागली आहे.

 

गेल्या बुधवारी दुबईत विमानाला अपघात झाला होता. या विमानात केरळचे मोहम्मद बशीर अब्दुल खादरही होते. विमानातील सर्व प्रवाशांना वाचवण्यात यश आलं.

 

मोहम्मद खादर यांच्या तिकीटाचा नंबर 0845 होता. त्यांच्या तिकीटाच्या या नंबरमुळे मोहम्मद भाग्यवान विजेते ठरले. त्यांना तब्बल 10 लाख डॉलरची म्हणजेच सुमारे 7 कोटी रुपयांची लॉटरी लागली.

 

मोहम्मद खादर यांनी ईदची सुट्टी दुबईत साजरी करण्याची योजना आखली होती. त्यांनी तिरुअनंतपूरममधून विमान तिकीट बूक केलं होतं. हेच तिकीट त्यांच्यासाठी लकी ठरलं.

 

मोहम्मद खादर हे दुबईतच कार डिलर ग्रुपमध्ये नोकरी करतात.