एक्स्प्लोर
पाकनं घेतला भारतीय तपास यंत्रणांचा धसका, ISIनं मसूदला लपवलं

मुंबई: आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेनं भारतीय तपास यंत्रणांचा धसका घेतल्याचं दिसतं आहे. कारण, पठाणकोट हल्ल्याचा मास्टरमाईंड मसूद अझहर, कासिफ जान आणि शहीद लतीफ यांना आयएसआयनं अंडरग्राऊंड केलं आहे.
गुप्तचर यंत्रणेला मिळालेल्या माहितीनुसार, पठाणकोट हल्लामुळे पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय दबाव वाढतो आहे. त्यामुळेच आयएसआयनं मसूद अजहरला त्यांच्या 'सेफ हाऊस' मध्ये ठेवण्यात आलं आहे.
भारतासोबत आंतरराष्ट्रीय स्तरावरुन सतत वाढणारा दबाव याला कारणीभूत असल्याचं बोललं जातं आहे. याआधीच एनआयए अर्थात भारताच्या राष्ट्रीय तपास यंत्रणेनं पठाणकोट हल्ल्याप्रकरणी मसूद अझहर आणि त्याचा भाऊ रऊफ यांच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे.
Before You Go
Rahul Gandhi News : आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं देवेंद्र फडणवीसांना पत्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















