मुंबई : जग आता कुठे कोविड-19 (Covid-19) महामारीतून (Pandemic) सावरत आहे. 2020 मध्ये कोरोना महामारीची (Corona Pandemic) सुरुवात झाली. या महामारीने (Epidemic) जगभरात कहर माजवला. जगभरात कोरोना महामारीमुळे सुमारे 25 लाख लोकांचा मृत्यू झाला. त्यानंतर कोविडची लस उपलब्ध झाली आणि याचा प्रसार आटोक्यात आला. दरम्यान, भविष्यातही महामारी संकट घोंघावत असल्याचा दावा जगभरातील शास्त्रज्ञांकडून करण्यात येत आहे. भविष्यात कोरोनापेक्षाही भयंकर महामारीमुळे कोट्यवधी लोकांचा मृत्यू होण्याची भीती असल्याचा दावा जगभरातील शास्त्रज्ञ करत आहेत. ब्रिटनमधील शास्त्रज्ञांनी दावा केला आहे की, भविष्यात 'डिसीज एक्स' नावाची महामारी पसरण्याची शक्यता आहे. या 'डिसीज एक्स' बद्दल धोक्याचा इशाराही देण्यात आला आहे.


कोरोनापेक्षाही धोकादायक महामारीचं संकट! 


येत्या काळात आणखी एका महामारीचं संकट आपल्यासमोर येणार आहे, असा दावा ब्रिटनमधील शास्त्रज्ञांनी केला आहे. यूकेच्या वैद्यकीय तज्ज्ञांनी असा दावा केला आहे की, डिसीज एक्स ही महामारी कोरोनापेक्षाही भयंकर ठरू शकते. इतकंच नाही तर, या नवीन विषाणूचा प्रकोप 1918-1920 च्या विनाशकारी स्पॅनिश फ्लूसारखा प्रभाव असू शकतो, असा दावाही या शास्त्रज्ञांनी दावा केला आहे. युके वॅक्सीन टास्कफोर्सचे अध्यक्ष डेम केंट बिंघम यांनी धोक्याचा इशारा देत म्हटलं आहे की, डिसीज एक्स महामारी कोरोना (Coronavirus) पेक्षा सात पटीने धोकादायक ठरू शकतो.


कोविडपेक्षा प्राणघातक, 5 कोटी जणांचा मृत्यू होण्याची शक्यता


2020 मध्ये जगभरात कोविड-19 महामारीची सुरुवात झाली. यामुळे जगभरात सुमारे 25 लाख लोकांचा मृत्यू झाला. तथापि, या महामारीनंतर, कोविड-19 ची लस उपलब्ध आहे. दरम्यान, यूकेच्या वैद्यकीय तज्ज्ञांनी असा दावा केला आहे की, येत्या काळात आणखी एक महामारी आपल्यासमोर येणार आहे, ज्याला डिसीज एक्स असे नाव देण्यात आले आहे. तज्ज्ञांनी चेतावणी दिली आहे की या नवीन विषाणूचा 1918-1920 च्या विनाशकारी स्पॅनिश फ्लूसारखा प्रभाव असू शकतो.


शास्त्रज्ञांचा दाव्यामुळे चिंता वाढली


डेली मेलच्या रिपोर्टनुसार, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या वैद्यकीय तज्ज्ञांनी भविष्यातील महामारीचं कारण ठरु शकणाऱ्या या आजाराबाबत धोक्याचा इशारा दिला आहे. यूकेच्या लस टास्कफोर्सचे अध्यक्ष असलेल्या डेम केट बिंघम यांनी धोक्याचा इशारा देत सांगितल आहे की, भविष्यातच साथीच्या रोगामुळे सुमारे 5 कोटी लोकांचा मृत्यू होऊ शकतो. शास्त्रज्ञांच्या या दाव्यामुळे जगाची चिंता वाढली आहे. 


कोरोना 19 पेक्षा 7 पटीने जास्त धोकादायक


यूकेच्या लस टास्क फोर्सचे अध्यक्ष असलेल्या डेम केट बिंघम यांनी भविष्याचील महामागीर बाबत चेतावणी दिली आहे. डिसीज एक्स X कोरोना (COVID-19) पेक्षा सातपट जास्त प्राणघातक ठरु होऊ शकतो. या विषाणूमुळे पुढील महामारी उद्भवू शकते, असा दावाही त्यांनी केला आहे. बिंघम यांनी सांगितलं की, शास्त्रज्ञांचं पथक विविध 25 विषाणूचं निरीक्षण करीत आहेत, त्यापैकी प्रत्येकामध्ये हजारो वैयक्तिक व्हायरस आहेत. यापैकी कोणताही विषाणू गंभीर महामारीमध्ये बदलू शकतो. प्राण्यांपासून माणसांमध्ये पसरू शकणारे विषाणू लक्षात घेत शास्त्रज्ञांकडून निरीक्षण केलं जात नाही. 


काय आहे डिसीज X?


वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO)नं डिसीज X हा संभाव्य आणि घातक आजार म्हणून घोषित केला आहे. डिसीज X हा भविष्यात पसरणारा धोकादायक आजार ठरू शकतो. दरम्यान, हा आजार नेमक्या कोणत्या विषाणूमुळे पसरेल, हे ही अजून स्पष्ट नाही. त्यामुळे, सध्या वैज्ञानिक रोगाच्या एक पाऊल पुढे जात डिसीज एक्स रोग पसरण्यापूर्वीच त्याचा विषाणू शोधून त्यावर उपाय करण्याचा प्रयत्न करत आहेत. प्राण्यांमध्ये आढळून येणारे असे व्हायरस जे मानवी शरीरापर्यंत पोहोचणारे अनेक व्हायरस शोधण्याच्या प्रयत्नात आहेत. अद्याप या आजाराचा एकही रुग्ण अद्याप समोर आलेला नाही. मात्र, भविष्यातील संभाव्य महामारीचा धोका लक्षात घेता शास्त्रज्ञांकडून त्या दृष्टीने संशोधन सुरु आहे, ज्यामुळे भविष्यात अशी महामारी उद्भवल्यास त्याचा सामना करणं सोपं जाईल.


डिसीज X रोगाची लस तयार करण्याचा शास्त्रज्ञांचा प्रयत्न


युकेच्या शास्त्रज्ञांनी डिसीज X हा रोग टाळण्यासाठी लस तयार करण्याची प्रक्रिया देखील सुरू केली आहे. विल्टशायर येथील उच्च-सुरक्षा असलेल्या पोर्टन डाउन प्रयोगशाळेत युकेच्या शास्त्रज्ञ डिसीज X रोगावरील लस तयार करण्याचं काम करत आहेत. 200 हून अधिक शास्त्रज्ञांचं पथक लस बनवण्याच्या कामात गुंतलेलं आहेत. 


प्राण्यांमधून मानवामध्ये पसरण्याची शक्यता


शास्त्रज्ञांच्या पथकाचं मूळ उद्दीष्ट अशा विषाणूवर आहे, जे प्राण्यामधील विषाणू असून भविष्यात हे विषाणू मानवाला संक्रमित करण्याची शक्यता आहे आणि यामुळे भविष्यात जगभरात नवी महामारी पसरण्याचीही भीती आहे. यामध्ये बर्ड फ्लू, मंकीपॉक्स आणि हंता व्हायरसच्या विषाणूंचा समावेश आहे. दरम्यान, यूके हेल्थ सिक्युरिटी एजन्सीचे (यूकेएचएस) प्रमुख प्रोफेसर डेम जेनी हॅरी यांनी सांगितलं की, हवामान बदल आणि लोकसंख्येतील बदल यासारख्या घटकांमुळे भविष्यात साथीच्या रोगांची शक्यता वाढत आहे.