Travel Tips: विमानातून प्रवास करण्याची मज्जा काही वेगळीच असते. पहिलं म्हणजे, आपण ठरवलेल्या ठिकाणी लवकर पोहोचतो आणि दुसरं म्हणजे, विमानात मनोरंजन (Entertainment) देखील तितकंच होतं, संपूर्ण प्रवास उत्साहाने भरलेला असतो. ढगही (Cloud) जवळून पाहता येतात.


विमानातून प्रवास करणं मजेशीर असतं, पण तुम्हाला माहीत आहे का की फ्लाईटमध्ये (Flight) अनेक गोष्टी इतक्या अस्वच्छ असतात की, त्यांना स्पर्श केल्याने तुम्ही अनेक धोकादायक बॅक्टेरियांच्या संपर्कात येऊ शकता? बरेच लोक विमान प्रवासादरम्यान विविध वस्तूंना स्पर्श करतात आणि त्याच हाताने कोणताही संकोच न करता अन्न खातात.


तुम्हीही असंच करत असाल, तर वेळीच काळजी घेण्याची गरज आहे. कारण यामुळे तुम्ही अनेक धोकादायक आजारांना (Disease) बळी पडू शकता. विमानातील कोणत्या गोष्टींवर सर्वाधिक बॅक्टेरिया असतात? हे आज जाणून घेऊया. जर तुम्ही या गोष्टींना स्पर्श केला, तर सर्वात आधी तुमचे हात स्वच्छ करा.


विमानातील पाच अस्वच्छ गोष्टी


1. ट्रे टेबल: तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, ट्रे टेबल ही फ्लाईटमधील सर्वात जास्त बॅक्टेरिया असलेली गोष्ट आहे. टॉयलेट फ्लश बटणापेक्षा ट्रे टेबलवर 8 पट जास्त बॅक्टेरिया आढळतात.


2. सीटच्या मागील खिसे: विमानातील सीट्सच्या मागच्या बाजूला असलेल्या पॉकेट्सवर देखील अनेक बॅक्टेरिया आढळतात. कारण बरेच लोक वापरलेले लहान मुलांचे डायपर, खराब झालेले टिश्यू पेपर किंवा वापरलेले रुमाल ठेवण्यासाठी हे पॉकेट्स वापरतात.


3. टॉयलेट लॉक: फ्लाईटच्या टॉयलेट लॉकवर देखील खूप जीवाणू असतात. कारण असे अनेक लोक आहेत जे शौच केल्यानंतर नीट हात स्वच्छ करत नाहीत, हात धुण्यासाठी हँडवॉश वापरत नाहीत, नंतर त्याच हाताने टॉयलेट लॉकला स्पर्श करतात आणि दरवाजा उघडतात.


4. सीटबेल्ट बकल्स: प्रत्येक व्यक्तीला फ्लाईट टेक ऑफ करण्यापूर्वी सीट बेल्ट बांधावा लागतो. तुम्हाला हे जाणूनही आश्चर्य वाटेल की, सीट बेल्टच्या बकल्सवर अनेक धोकादायक बॅक्टेरिया असतात. तुम्ही सीट बेल्ट लावल्यानंतर त्याच हाताने अन्न खाणार असाल तर हे बॅक्टेरिया तुमच्या शरीरात प्रवेश करू शकतात.


5. आर्मरेस्ट: आर्मरेस्ट ही अशी जागा आहे, जिथे तुम्ही तुमचा कोपर टेकवता, त्यावर हात ठेऊन आराम करता. आर्मरेस्ट ही जागाही अत्यंत अस्वच्छ असते, कारण अनेक मुलं घाणेरडे हात किंवा पाय त्यावर ठेवतात. त्यामुळे प्रवासादरम्यान नेहमी सॅनिटायझर वापरण्याची सवय लावा.


हेही वाचा:


WWE Fighting: चक्क ट्रेनमध्येच झाली WWE सारखी फायटिंग; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल