कराची: पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील प्रसिद्ध शाह नुरानी दर्ग्या बाहेर संध्याकाळी शक्तीशाली बॉम्बस्फोट झाला. या बॉम्ब स्फोटात 52 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 100 हून अधिकजण गंभीर जखमी झाले आहेत.
बलुचिस्तानातील लासबेला जिल्ह्यामध्ये हा दर्गा आहे. धमाल या सुफी नृत्याच्या कार्यक्रमासाठी भाविक मोठया संख्येने जमले असताना, हा स्फोट झाला. हा भाग कराचीपासून 250 किलोमीटर अंतरावर आहे.
'एक्सप्रेस ट्रिब्यून'ने पोलिसांनी दिलेल्या माहितीच्या आधारे दिलेल्या वृत्तानुसार, हा एक आत्मघातकी हल्ला असून, 14 वर्षीय एका मुलाने हा स्फोट घडवून आणले असल्याचे सांगितले. पण अद्याप कुठल्याही दहशतवादी गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नसल्याचेही सांगण्यात येत आहे.
दरम्यान, या घटनेनंतर मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरु असून या घटनेतील मृतांची संख्या वाढण्याचीही शक्यता व्यक्त होत आहे.