'फसवण्याचा प्रयत्न केला तर याद राखा'
मोदी म्हणाले की, ''देशाला स्वांतत्र्य मिळाल्यापासून अनेकजण काळा पैसा जमा करत आहेत. त्यांच्याकडून हिशेब घेण्याचं काम सुरु आहे. यामध्ये फसवण्याचा कुणी प्रयत्न केला, तर त्यांच्यावर कडक कारवाई होईल. तेव्हा ज्यांच्याकडे काळा पैसा आहे, त्यांनी आताच सावध व्हावे,'' असा इशाराही त्यांनी दिला.
'भीतीपोटी पैसे गंगेत टाकत आहेत'
मोदी पुढे म्हणाले की, ''सरकार प्रमाणिक लोकांच्यासोबत आहे. त्यामुळे नोटा बदलण्याच्या निर्णयाचे अनेकांकडून स्वागत झालं. लोकांना यावेळी थोडा त्रास झाला, मात्र तरीही त्यांनी निर्णय स्वीकारला. पण काळा पैसा बाळगणाऱ्यांनी भीतीपोटी आता गंगेत पैसे फेकायला सुरुवात केली आहे.''
'जनधन योजनेमुळे 45 कोटी जमा'
त्यांनी आपल्या भाषणात जनधन योजनेचा उल्लेखही केला. ते म्हणाले की, ''जनधन योजनेअंतर्गत गरिबांचे मोफत बँक खाते उघडली गेली. केंद्र सरकारच्या या योजनेमुळे गरिबांनी तब्बल 45 कोटी रुपये बँक खात्यात जमा केले.''
दरम्यान 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून रद्द केल्याने अनेकांची तारांबळ उडाली. आपल्याकडील 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी बँकेमध्ये मोठी गर्दी केली आहे.
तर दुसरीकडे काळा पैसा बाळगणाऱ्या व्यक्ती भीतीपोटी 1000 च्या नोटा कचराकुंडीत अथवा फाडून नदीत टाकत असल्याच्या घटना समोर येत आहेत.
व्हिडीओ पाहा