या महिला कर्मचाऱ्याने गायलेलं गाणं सोशल मीडियावर व्हायरल झालं. त्यानंतर अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर या 25 वर्षीय महिला कर्मचाऱ्याच्या वेतन आणि भत्त्यांमध्ये होणारी वाढ दोन वर्षांसाठी स्थगित करण्यात आली. शिवाय यापुढे असं केल्यास कठोर कारवाई करण्याचाही इशारा देण्यात आला.
पाकिस्तानचे नवे पंतप्रधान इम्रान खान यांनी अनेकदा दावा केलाय, की दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यासाठी भारताने एक पाऊल पुढे टाकलं, तर आम्ही दोन पाऊलं पुढे टाकू. पण जो देश भारतीय गाणं गायल्यामुळे शिक्षा देऊ शकतो, तो देश संबंध काय सुधारणार असा सवाल केला जात आहे.
पाहा व्हिडीओ :