नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तानमधल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानमध्ये सुरु असलेल्या भारतीय वाहिन्यांवर बंदी घालण्यात आली आहे.

पाकिस्तानी प्रसारण नियंत्रण विभागानं हा फतवा जारी केला आहे. त्यामुळे उद्यापासून कुणीही भारतीय चॅनल प्रसारित करताना किंवा पाहताना आढळले, तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा इशारा सरकारनं दिला आहे.

भारतामध्ये पाकिस्तानी कलाकारांना बंदी घालण्याची मागणी जोर धरत असतानाच आता पाकिस्तानने हे पाऊल उचललेलं आहे. फक्त वाहिन्याच नाही, तर रेडिओ स्टेशन्सच्या सहक्षेपणावरही बंदी घालण्यात आली आहे.

दरम्यान, उरी हल्ल्यानंतर भारत-पाक संबंधामध्ये मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला. त्यातच पाकिस्तानी कलाकारांना भारतात बंदीची मागणी जोर धरु लागली. मनसेच्या इशाऱ्यानंतर अनेक पाकिस्तानी कलाकारांनी भारत सोडलं. मात्र, भारत सरकारकडून अशी कोणतीही बंदी घालण्यात आली नाही. पण दुसरीकडे पाकिस्तानी सरकारनं आता थेट भारतीय चॅनलच बंद करण्याचा फतवा काढला आहे.

संबंधित बातम्या:

मनसेचे मल्टिप्लेक्समधील कामगारही पाक कलाकारांविरोधात

यापुढे पाक कलाकारांना सिनेमात घेणार नाही : करण जोहर

पाक कलाकारांबाबत आमीरची पत्नी म्हणते...

भारत-पाक संबंधांवरुन फिल्मस्टारच टार्गेट का? : प्रियंका

आपल्यासाठी देश आणि देशवासीयांचं संरक्षण महत्वाचंः गंभीर