रियाध : सौदी अरेबियाच्या राजकुमाराला मित्राच्या हत्येच्या गुन्ह्यासाठी दोषी ठरवत देहदंडाची शिक्षा देण्यात आली आहे. सौदी अरेबियात हत्या, अंमली पदार्थांची तस्करी आणि धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांना अशा प्रकारची शिक्षा दिली जाते.


सौदी अरेबियाचा राजकुमार तुर्की बिन सउद अल-कबीर याच्यावर आदिल अल-मोहम्मद या मित्राला गोळ्या घालून हत्या केल्याचा आरोप सिद्ध झाल्यावर त्याला शिक्षा देण्यात आली. राजकुमाराचा तलवारीनं शिरच्छेद करुन मृत्यूदंड देण्यात आला. तसंच शिरच्छेदानंतर देशात सर्वांना समान न्याय मिळत असल्याचंही सांगण्यात आलं.

सौदी अरेबियाच्या गृह मंत्रालयाने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या देशात सर्वांना समान वागणूक आणि न्याय मिळतो हा जगासाठी संदेश असल्याचंही सांगण्यात आलं आहे. सौदी अरेबियामध्ये यावर्षी 134 जणांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली आहे.