लाहोर: पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अविश्वास प्रस्तावाआधी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. पण त्यासाठी त्यांनी तीन अटी ठेवल्या आहेत. असं असलं तरी त्यांच्यासमोर अविश्वास ठरावाला सामोरं जाण्याशिवाय कोणताही मार्ग नसल्याचं सांगितलं जातंय. 


पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर अविश्वास प्रस्ताव आणण्यात आला आहे. पण आपण शेवटच्या चेंडूपर्यंत खेळत राहू असं ते म्हणाले होते. त्यामुळे शेवटपर्यंत काही ना काही मार्ग निघेल अशी आशा त्यांना आहे. त्यामुळे त्यांनी आता नवीन राजकीय खेळी खेळली असून राजीनामा द्यायचं कबूल केलं आहे पण त्यासाठी तीन अटी असल्याचं स्पष्ट केलं आहे. 


काय आहेत या तीन अटी? 
1. पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटलं आहे की खुर्ची सोडल्यानंतर त्यांना अटक करण्यात येऊ नये. तसेच त्यांच्या कोणत्याही मंत्र्याला अटक करण्यात येऊ नये.
2. दुसरी अट अशी आहे की त्यांना NAB अंतर्गत अटक करण्यात येऊ नये. व्होटिंग नको तर  NRO असावं अशी मागणी त्यांनी केली आहे. 
3. तिसरी अट अशी आहे की शहबाज शरीफ यांच्या ठिकाणी दुसरं कोणीतरी पंतप्रधान बनायला हवं. 


भारताचं कौतुक
दरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी काल देशवासियांना संबोधित केलं. या भाषणात त्यांनी भारताचं कौतुक केलं. त्यांनी म्हटलं की, मी भारतातील लोकांना इतरांपेक्षा अधिक जाणतो. मला वाईट वाटतंय की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा आणि काश्मीरमधील परिस्थितीच्या कारणामुळे संबंध बिघडले. भारताबाबत काही बोलण्यास कुणाची हिंमत नाही. कुणा परदेशी ताकदीची हिंमत नाहीय की, भारताच्या परराष्ट्रीय धोरणात हस्तक्षेप करेल. भारत एक स्वाभिमानी देश आहे, असं इम्रान म्हणाले. 


संबंधित बातम्या: