रावळपिंडी : पाकिस्तानच्या रावळपिंडी येथे पाकिस्तानी लष्कराचं विमान कोसळून झालेल्या दुर्घटनेत पाच सैनिकांसह 15 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 20 जण जखमी आहेत. दुर्घटनेत विमानाच्या दोन्ही वैमानिकांचाही मृत्यू झाला आहे. विमानाचा कंट्रोल रुमशी अचानक संपर्क तुटल्यानंतर काही वेळातच विमान क्रॅश झालं. दुर्घटनेचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.


पाकिस्तानी सैन्याचं हे छोटं विमान रावळपिंडी येथील गरारी शहराजवळील परिसरात दुर्घटनाग्रस्त झालं. पाकिस्तानी लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, एकूण 15 जणांचा यामध्ये मृत्यू झाला असून त्यात पाच सैनिकांचा समावेश आहे. मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. कारण काही जणांची प्रकृती गंभीर आहे.





विमान दुर्घटना कशी घडली याबाबत पाकिस्तानी लष्कराने अद्याप कोणतीही माहिती दिली नाही. मात्र रावळपिंडीतील आजूबाजूच्या परिसरात विमान नियमीत प्रशिक्षणासाठी उड्डाण घेत असल्याचं लष्कारांने सांगितलं. घटनास्थळी बचावकार्य अद्याप सुरु आहे.