एक्स्प्लोर

संपूर्ण पाकिस्तानात बत्ती गुल झाल्यानं 'ब्लॅकआऊट'; जागतिक स्तरावर इमरान खान सरकारची नाचक्की

काल संपूर्ण पाकिस्तानमध्ये पॉवर सिस्टम फेल झाल्यामुळे पॉवर ब्लॅकआऊट झाल्याचं पाहायला मिळालं. अद्यापही वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला नसून अनेक शहरांमध्ये वीज गायब आहे.

इस्लामाबाद : काल रात्री पाकिस्तान अचानक अंधारात गेल्यामुळे गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. संपूर्ण पाकिस्तानमध्ये पॉवर सिस्टम फेल झाल्यामुळे पाकिस्तानात बत्ती गुल झाली होती. पाकिस्तानमधील कोणतंही असं शहर नाही किंवा चौक नाही, जिथे वीज असल्याचं पाहायला मिळालं नाही. दरम्यान, वीज गेल्यानंतर बराच काळ लोटल्यानंतरही अनेक भागांत अद्याप वीज परत आलेली नाही.

संपूर्ण पाकिस्तानात वीज गेल्याचं वृत्त वाऱ्यासारखं जगभरात पसरलं, त्यानंतर ट्विटरवर #blackout हॅशटॅग ट्रेंड करु लागला. कोणी या घटनेला भारतीय वायू सेनेने केलेला हल्ला म्हणत होतं तर कोणी याला सायबर अटॅक म्हणत होतं. यादरम्यान पाकिस्तानी टीव्ही चॅनल्सवरही पॉवर ब्लॅकआउटचं वृत्त प्रसारित होऊ लागलं. असं सांगण्यात येत आहे की, पाकिस्तानमधील सर्वच मोठ्या शहरांमध्ये म्हणजेच, कराची, इस्लामाबाद, लाहौर, पेशावर, रावलपिंडी याठिकाणीही पॉवर ब्लॅकआउट झालं आहे. यासर्व गोंधळादरम्यान, पाकिस्तानच्या ऊर्जा मंत्र्यांनी ट्विटरवर एक ट्वीट केलं आहे.

ऊर्जा मंत्र्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं की, "रात्री 11 वाजून 41 मिनिटांनी पॉवर ट्रान्समिशन सिस्टमची फ्रिक्वेंसी अचानक 50 ते 0 ने खाली आल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे संपूर्ण देशात ब्लॅकआऊट झालं आहे. यामागील कारण शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे नागरिकांनी संयम राखावा."

अर्धा देश अद्यापही वीजेच्या प्रतिक्षेत

पाकिस्तानचे सूचना मंत्री शिबली फराज यांनीही पॉवर ब्लॅकआउट बाबत आपलं म्हणणं जारी केलं आहे. ते म्हणाले की, एनटीडीसीच्या सिस्टिममध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. सिस्टिम रिस्टोअर करण्याचं काम सुरु आहे. त्यानंतर काही वेळाने ऊर्जा मंत्रालयाच्या ट्विटर अकाउंटवरुन नॅशनल पॉवर कंट्रोल सेंटरमध्ये वीज पुरवठा सुरळीत करण्याचं काम सुरु असून ऊर्जामंत्री त्याची पाहणी करतानाचा एक फोटोही शेअर करण्यात आला. त्यानंतर जवळपास 1.45 वाजता एनटीडीसीच्या संगजनी आणि मर्दन ग्रिडमध्ये वीज पुरवठा सुरळीत झाला असल्याची सूचना देण्यात आली. त्यानंतर शाही बाग ग्रिड आणि बहरिया टाउनमध्येही वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला. सकाळी इस्लामाबाद इलेक्ट्रिक सप्लाई कंपनीच्या ग्रीडची वीज सुरु करण्यात आली. दरम्यान, पॉवर ब्लॅकआऊटला अनेक तास उलटल्यानंतरही जवळपास अर्ध्या पाकिस्तानात वीज अद्यापही गायब आहे.

पाकिस्तानात वीज गायब होण्याची गोष्टी काही नवी नाही. याआधी 2018मध्ये दोनवेळा पाकिस्तानात पॉवर ब्लॅकआऊट झाला होता. 2015मध्ये जेव्हा बलूच आंदोलकांनी पॉवर ग्रीडवर हल्ला केला होता, त्यावेळीही पाकिस्तानमध्ये पॉवर ब्लॅकआऊट झाला होता.

महत्त्वाच्या बातम्या

iPhone Duo Marathi News: ॲपलचा पहिला फोल्डेबल फोन 'iPhone Duo' लाँच; सगळ्यांचं लक्ष वेधलं, किंमतीत एखादी कार विकत घेता येईल, पाहा A टू Z माहिती
ॲपलचा पहिला फोल्डेबल फोन 'iPhone Duo' लाँच; सगळ्यांचं लक्ष वेधलं, किंमतीत एखादी कार विकत घेता येईल, पाहा A टू Z माहिती
iPhone 18 Pro 18 Pro Max And iPhone Duo Marathi News: ॲपलकडून iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max लाँच; iPhone Duo च्या एन्ट्रीने सोशल मीडियावर धुमाकूळ, भारतात किंमत किती?, आयफोन 18 सिरीजची A टू Z माहिती
ॲपलकडून iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max लाँच; iPhone Duo च्या एन्ट्रीने सोशल मीडियावर धुमाकूळ, भारतात किंमत किती?, आयफोन 18 सिरीजची A टू Z माहिती
Cyber Attack: लंडनच्या हिथ्रो एयरपोर्टवर सायबर हल्ला, तब्बल 1200 विमानांचे मार्ग बदलले; पुरस्कारासाठी गेलेल्या उपमुख्यमंत्र्यांच्या 6 अधिकाऱ्यांना फटका, स्वित्झर्लंडमध्ये अडकले
लंडनच्या हिथ्रो एयरपोर्टवर सायबर हल्ला, तब्बल 1200 विमानांचे मार्ग बदलले; पुरस्कारासाठी गेलेल्या उपमुख्यमंत्र्यांच्या 6 अधिकाऱ्यांना फटका, स्वित्झर्लंडमध्ये अडकले
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंच्या नावाचा आंतरराष्ट्रीय पातळीवर डंका, लाडकी बहीण योजनेमुळे इंग्रजही प्रभावित, पुरस्कार द्यायला लंडनला बोलावलं
एकनाथ शिंदेंच्या नावाचा आंतरराष्ट्रीय पातळीवर डंका, लाडकी बहीण योजनेमुळे इंग्रजही प्रभावित, पुरस्कार द्यायला लंडनला बोलावलं

व्हिडीओ

Vidyanand Bapat News : डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना कायदेशीर नोटीस : ABP Majha
DCM Eknath Shinde London : लंडनमध्ये शिंदेशाही, ब्रिटिश संसदेत शिंदेंचा गौरव | Special Report ABP Majha
Garba Controversy : दांडियाला मुस्लिम तरुणांच्या प्रवेशावरुन वादाचा गरबा | Special Report ABP Majha
Uday Samant Prasad Lad PC : जरांगेंनी उपोषण स्थगित करावे, उदय सामंत, प्रसाद लाड यांची संपूर्ण PC
Ujjain Khade Hanuman Mandir Marathi News: मंदिर हटवलं, पण चार दिवस झाले हनुमानाची मूर्ती हलेना; उज्जैनमध्ये काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange Patil On Amruta Fadnavis: अमृता फडणवीस म्हणाल्या, घरी जेवायला या; मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया, थेट शब्द देऊन टाकला!
अमृता फडणवीस म्हणाल्या, घरी जेवायला या; मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया, थेट शब्द देऊन टाकला!
Supreme Court Abu Salem: कुख्यात अबू सालेमला 'सर्वोच्च' दणका; 1993 मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात मुदतपूर्व सुटकेची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली
कुख्यात अबू सालेमला 'सर्वोच्च' दणका; 1993 मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात मुदतपूर्व सुटकेची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली
Pune Crime News: पुण्यात मध्यरात्री थरार! MPSCच्या विद्यार्थ्याचे मैत्रिणीच्या बॉयफ्रेंडनेच केलं अपहरण; पोलिसांची चक्र फिरली अन्..., काही तासांतच केली सुटका
पुण्यात मध्यरात्री थरार! MPSCच्या विद्यार्थ्याचे मैत्रिणीच्या बॉयफ्रेंडनेच केलं अपहरण; पोलिसांची चक्र फिरली अन्..., काही तासांतच केली सुटका
Pune DJ Ban : '...तर बापट यांनी ॲमेझॉनच्या जंगलात जावं', डीजे विरोधात भूमिका घेणाऱ्या विद्यानंद बापटांना कायदेशीर नोटीस पाठवणाऱ्या प्रदीप नाईकांचा इशारा, नेमकं काय म्हणाले?
'...तर बापट यांनी ॲमेझॉनच्या जंगलात जावं', डीजे विरोधात भूमिका घेणाऱ्या विद्यानंद बापटांना कायदेशीर नोटीस पाठवणाऱ्या प्रदीप नाईकांचा इशारा, नेमकं काय म्हणाले?
iPhone 18 Series Marathi News: 18 Pro, 18 Pro Max आणि Duo; ॲपलकडून 3 जबरदस्त आयफोन लाँच; पाहा 10 फोटो
18 Pro, 18 Pro Max आणि Duo; ॲपलकडून 3 जबरदस्त आयफोन लाँच; पाहा 10 फोटो
Mumbai News: विद्यार्थ्यांच्या डब्यात कांदा-लसूण नको, पर्यूषण पर्वाचा वाद थेट विद्यार्थ्यांच्या डब्यापर्यंत पोहचला; मिरा-भाईंदर अन् वसईतील पालकांना शाळेचा मेसेज, नेमकं प्रकरण काय?
विद्यार्थ्यांच्या डब्यात कांदा-लसूण नको, पर्यूषण पर्वाचा वाद थेट विद्यार्थ्यांच्या डब्यापर्यंत पोहचला; मिरा-भाईंदर अन् वसईतील पालकांना शाळेचा मेसेज, नेमकं प्रकरण काय?
Rani Mukerji In Maharashtra State Film Awards: 'महाराष्ट्र माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग...'; राणी मुखर्जीच्या मराठमोळ्या अंदाजानं जिंकली मनं, भाषणाची सुरुवात मराठीतून करत भरभरुन बोलली... VIDEO
'महाराष्ट्र माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग...'; राणी मुखर्जीच्या मराठमोळ्या अंदाजानं जिंकली मनं, भाषणाची सुरुवात मराठीतून करत भरभरुन बोलली... VIDEO
Eknath Shinde Honoured Sith Commonwealth Public Leadership Award: ब्रिटिश संसदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा गौरव; 'कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप रिकग्निशन' पुरस्कार प्रदान, पाहा Photo
ब्रिटिश संसदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा गौरव; 'कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप रिकग्निशन' पुरस्कार प्रदान, पाहा Photo
Embed widget