Snowfall in Pakistan : पाकिस्तानातील पर्वतीय पर्यटन स्थळ मुरी येथे मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी आणि पर्यटकांची संख्या जास्त असल्याने वाहनांमध्ये अडकल्याने नऊ मुलांसह सुमारे 21 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर शनिवारी हा भाग आपत्तीग्रस्त क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. रावळपिंडी जिल्ह्यात असलेल्या मुरीकडे जाणारे सर्व रस्ते बंद झाल्याने हजारो वाहनांसह पर्यटक रस्त्यावरच अडकले.


'डॉन' वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, पर्यटनस्थळी सुमारे एक हजार गाड्या अडकल्या आहेत. पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी बचाव कार्याला गती देण्याच्या आणि अडकलेल्या पर्यटकांना मदत देण्याच्या सूचना दिल्या आहेत. 'रेस्क्यू 1122' ने तयार केलेल्या यादीनुसार, नऊ मुलांसह सुमारे 21 जणांचा मृत्यू झाला आहे.


पंतप्रधान इम्रान खान यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, मुरीला जाताना पर्यटकांचा मृत्यू झाल्याच्या घटनेने मोठा धक्का बसला आणि दु:ख झाले आहे. खान यांनी ट्विट केले की, "जोरदार बर्फवृष्टी आणि हवामानाची माहिती न घेता मोठ्या प्रमाणात पर्यटकांचे आगमन यामुळे तयारी करता आली नाही. जिल्हा प्रशासनाला चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत आणि अशी दुर्घटना पुन्हा घडू नये यासाठी कडक नियम करण्यात येत आहेत."


केंद्रीय गृहमंत्री शेख रशीद यांनी सांगितले की, रस्त्यावरून वाहने हटवण्यासाठी लष्कर तैनात करण्यात आले आहे. ते म्हणाले की, 15-20 वर्षांनंतर मुरीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात पर्यटक आले आहेत.


महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha