काबूल : अफगाणिस्तानावर तालिबान्यांनी ताबा मिळवल्यानंतर तेथील लोक जीवाच्या आकांताने देश सोडून जात होते. लोक आपला जीव वाचवण्यासाठी, देश सोडण्यासाठी धावपळ करत आहेत. यावेळी अफगाणिस्तान विमानतळावर नागरिकांच्या गोंधळात 2 महिन्याचे बाळ हरवल्याची घटना घडली होती. ही घटना 19 ऑगस्टला घडली होती. अखेर हे हरवलेले बाळ त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
नेमक काय घडल होतं
अफगाणिस्तानातील तालिबान्यांच्या नाट्यावेळी विमानतळावर पालकांपासून दुरावलेल्या नवजात बालकाची अखेर नातेवाईकांशी भेट घडली आहे. सोहेल अहमदी असे या बालकाचे नाव असून, अवघ्या दोन महिन्याचे असताना अफगाणिस्तान विमानतळावरील हजारो लोकांच्या गर्दीत पालकांपासून या बाळाची ताटातूट झाली होती. तालिबान्यांच्या भितीपीटो मोठ्या संख्येने अफगाणिस्तानातील नागरिक देश सोडत होते. त्यावेळी विमानतळावर लोकांची मोठी गर्दी झालेली दिसत होती. कोणत्याही परिस्थितीत देश सोडायचाचं याच निर्धाराने लोक विमानतळाकडे जात होते. यावेळी 19 ऑगस्टला 2021 ला अफगानीस्तानच्या अमेरिका दुतावासात नोकरीला असेलेला कर्मचारी देखील काबूल विमानतळावरुन देश सोडून जात होता. यावेळी त्या कर्मचाऱ्याने विमानताळावर जाताना भिंतीच्या पलीकडे असणाऱ्या सुरक्षा कर्मचाऱ्याकडे आपले 2 महिन्याचे बाळ दिले. त्यावेळी तो अमेरिकेचा सुरक्षा सक्षक असल्याचे त्याला वाटले होते. ते बाळ सोपवल्यानंतर अचानक लोकांची गर्दी सुरक्षा रक्षकांनी मागे सारली होती. या लोकांच्या गर्दीतच ते बाळ हरवले होते. ते बाळ तिथेच विमानतळावर होते. त्यानंतर एका रिक्षाचालकाने त्या बाळाला आपल्या घरी नेऊन त्याचा सांभाळ केला. अखेर तपासानंतर ते बाळ रिक्षाचालकाच्या घरी सापडले असून, पोलिसांनी काबूलमधील नातेवाईकांकडे ते बाळा सूपूर्द केले आहे.
नोव्हेंबरमध्ये रॉयटर्सने याबाबत त्या बाळाच्या फोटोसहीत बातमी प्रसिद्ध केली होती. अखेर ते बाळ सापडले आहे. 29 वर्षीय रिक्षा चालक हमीद साफी यांनी त्या बाळाचा सांभाळ केला. सात आठवड्यांहून अधिक काळानंतर तालिबान पोलिसांनी हमीदकडून ताब्यात घेतले. ते बाळ सध्या त्याच्या काबूलमधील आजोबांकडे आणि काबूलमध्ये असलेल्या इतर नातेवाईकांकडे परत देण्यात आले आहे.
सध्या त्या मुलाचे आई-वडील हे अमेरिकेत आहेत. लवकरच त्या मुलाची त्यांच्या आई वडीलांशी भेट होईल.
मिर्झा अली अहमदी असे मुलाच्या वडिलांचे नाव आहे. जे अमेरिकेच्या दूतावासात सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते. विमानतळाच्या गेटजवळ असणाऱ्या गर्दीत आपला मुलगा चिरडला गेल्याची भिती आईवडिलांना होती.