न्यूयॉर्क : संयुक्त राष्ट्राच्या महासभेत भारतावर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानची राजदूत महीला लोधी चांगल्याच तोंडावर आपटल्या आहेत. महासभेत त्यांनी एक बनावट फोटो दाखवून भारतीय लोकशाहीचा खरा चेहरा असा असल्याचं दावा केला. पण त्यांच्या या दाव्याचा फोल पणा लगेच समोर आल्याने लोधी चांगल्याच तोंडावर अपटल्या आहेत.


काल संयुक्त राष्ट्राच्या महासभेत बोलताना भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी 'पाकिस्तान हा देश दहशतवादाचा कारखाना' असल्याचं सांगितलं होतं. आपल्या 22 मिनिटांच्या भाषणात सुषमा स्वराज पाकिस्तानवर जोरदार हल्ला चढवला. पाकिस्तानने आम्हाला मानवाधिकाराबद्दल सांगण्यापेक्षा स्वत: आत्मचिंतन करावे असेही त्या यावेळी म्हणाल्या.

याला उत्तर देताना पाकिस्तानच्या राजदूत महीला लोधी यांनी आज एक बनावट फोटोच्या माध्यमातून भारतीय लोकशाहीचा खरा चेहरा असा असल्याचा दावा केला. तसेच जम्मू-काश्मीरमध्ये भारताकडून कशाप्रकारे अत्याचार सुरु आहे, याबद्दल सांगितलं.

विशेष म्हणजे, या फोटोद्वारे लोधींनी भारताकडून काश्मीरमध्ये क्रौर्याची मोहीम चालवण्याचा आरोप केला. आपला मुद्दा महासभेला पटवून देण्यासाठी त्यांनी एका मुलीचा फोटो दाखवला. या फोटोतील मुलगी गंभीर जखमी झाल्याचं दिसत होती.

पण लोधींनी जो फोटो दाखवला, तो 17 वर्षीय राव्या अबु जोमचा होता. ती 2014 मधील गाझापट्ट्यात इस्रायलच्या हवाई हल्ल्यात जखमी झाली होती. या हल्ल्यात तिच्या घराला लक्ष्य करण्यात आलं होतं.

विशेष म्हणजे, हा फोटो न्यूयॉर्क टाईम्स आणि गार्जियनसह अनेक वृत्तपत्रांनी आपल्या ऑनलाईन फोटो गॅलरित दाखवलं होतं. त्यामुळे लोधींच्या दाव्यातील फोलपणा तत्काळ समोर आल्याने, पाकिस्तान महासभेत चांगलाच तोंडावर अपटला आहे.

संबंधित बातम्या

आम्ही शास्त्रज्ञ घडवले तर पाकनं दहशतवादी : सुषमा स्वराज

पाकिस्तान नव्हे ते तर टेररिस्तान, भारताचा UN मध्ये पलटवार