Oxford Dictionary Update : ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये (Oxford English Dictionary) दरवर्षी आपल्या शब्दकोशामध्ये नेहमी काही शब्द समाविष्ट करण्यात येतात. यावर्षीही काही शब्दाचा समावेश करण्यात आला आहे. ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये जून महिन्यात नव्या शब्दांची नोंद झाली आहे. या नव्याने नोद करण्यात आलेल्या शब्दांमध्ये 'टर्फ' (Terf), पॅनजेंडर (Pangender), वॅक्सर (Vaxxer) यांसारख्या अनेक शब्दांचा समावेश आहे. यानुसार 'टर्फ' (Terf) हा शब्दाचा अर्थ ट्रान्सजेंडरच्या हक्क विरोध करणारे लोक असा होतो. दरम्यान, डिक्शनरीमध्ये समावेश करण्यात आलेला 'टर्फ' हा शब्द विवादित ठरला.
जून महिन्यात ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये करण्यात आलेल्या अपडेटमध्ये लिंग आणि लैंगिकतेसंबंधित अनेक नवीन शब्दांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने Multisexual (बहुलिंगी), Pangender (ज्या व्यक्तीची ओळख एका लिंगापुरती मर्यादित नाही आणि एकाच वेळी सर्व लिंगांचा समावेश), Gender Expression (लिंग अभिव्यक्ती - ज्या पद्धतीने एखादी व्यक्ती त्यांची लिंग ओळख व्यक्त करते, विशेषत: त्यांचे स्वरूप, पोशाख आणि वागणूक), Gender Presentation (एखाद्या व्यक्तीचे वर्तन, आवड, सादरीकरण) आणि Enby (Non-Binary Gender) या शब्दांचा समावेश आहे.
ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये (Oxford English Dictionary) दरवर्षी आपल्या डिक्शनरीमध्ये जगभरात नव्याने प्रचलित होणाऱ्या शब्दांची नोंद करत त्यांचा शब्दकोशामध्ये समावेश करण्यात येतो. दरवर्षी गोळा केलेल्या माहितीच्या आधारे नवीन शब्द आणि त्यांच्या व्याख्या जोडल्या जातात. दरम्यान जून महिन्याच्या ऑक्सफर्ड डिक्शनरी अपडेटमध्ये अनवॅक्स्ड (Unvaxxed), अनजॅब्ड (Unjabbed) आणि व्हॅक्सर (Vaxxer) या शब्दाचाही समावेश आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या