Iran launches Rocket : आण्विक मुद्द्यावरील चर्चा पुन्हा सुरु झाल्यानंतर इराणने रॉकेट लाँच (Rocket Launch) केलं आहे. देशाच्या सरकारी वाहिनीनं रविवारी रॉकेट प्रक्षेपण झाल्याची घोषणा केली आहे. इराणने उपग्रह वाहकचा (Satellite carrier) वापर करत हे रॉकेट लाँच केलं आहे. दरम्यान हे रॉकेट लाँच कधी करण्यात आलं याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. आण्विक ऊर्जेच्या मुद्द्यावर युरोपिय संघ (EU - European Union) आणि इराण यांच्यामध्ये काही काळापासून अडकलेल्या चर्चेवर सहमती मिळाल्यानंतर लगेचच इराणनं हे रॉकेट लाँच केलं आहे.


मागली काही काळापासून युरोपिय संघ आणि इराण यांच्यामध्ये आण्विक मुद्द्यांवरील चर्चेमध्ये अडथळा निर्माण झाला होता. हा अडथळा दूर करण्यासाठी आणि इराणच्या आण्विक ऊजेच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी युरोपिय संघाचे परराष्ट्र धोरण प्रमुख जोसेप बोरेल यांच्या इराण दौऱ्यानंतर रॉकेट लाँचची ही मोठी बातमी समोर आली आहे. जोसेप बोरेल यांनी इराण दौऱ्यावर तेहरानला भेट दिली होती.


रॉकेट लाँच अमेरिकेनं नोंदवला होता आक्षेप
इराणच्या रॉकेट लाँचवर अमेरिकेनं (US) आक्षेप नोंदवत म्हटलं होतं की, रॉकेट लाँच करणं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या संकल्पांचं उल्लंघन आहे. 


इराणकडून 'हा' दावा
दरम्यान , आपण अण्वस्त्रांचा मार्गाने जातं नसल्याचा दावा इराणकडून करण्यात येत आहे. रॉकेट आणि उपग्रह प्रक्षेपण लष्कराचा भाग नसल्याचा दावा इराणनं केला आहे. इराणच्या सरकारी वृत्तसंस्थेनं संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते अहमद होसेनी यांच्या हवाल्यानं म्हटलं आहे की, उपग्रह वाहक इराणच्या अंतराळ उद्योगाला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल.


महत्त्वाच्या इतर बातम्या