Why We Use K Instead Of Thousand : आपण काही शब्दांसाठी शॉर्ट अक्षरांचा वापर करतो. अनेक वेळा त्या अक्षरांचा आपल्याला अर्थ देखील आपल्याला माहित नसतो. व्हॅट्सअप चॅटमध्ये अनेक वेळा ओके या शब्दासाठी केवळ K हे अक्षय वापरले जाते. तसेच तुम्ही ऐकलं असेल की काही लोक एक हजारला 1K असं म्हणतात. काही यूट्यूबर्स किंवा सोशल मीडिया युझर हे 1k किंवा 2k फॉलोवर्स अशा शब्दांचा वापर करतात. एक हजारला 1k का म्हटलं जात? तसेच k चा अर्थ काय याबाबत जाणून घेऊयात...
‘Chilioi’ हा एक ग्रीक शब्द आहे. या शब्दाचा अर्थ हजार असा होतो. असं म्हटलं जात की k या अक्षराचा वापर करण्यास तेव्हा पासूनच सुरूवात झाली. बायबलमध्ये देखील K या अक्षयराचा वापर हजार या शब्दासाठी करण्यात आला आहे.
‘Chilioi’ या ग्रीक शब्दाचा वापर फ्रेंच भाषेमध्ये देखील करण्यात आला आहे. पण फ्रेंचमध्ये या शब्दाचा अर्थ बदलला आणि किलोग्राम असा त्याचा अर्थ झाला. म्हणजे 1000 ग्रॅमला 1 किलोग्रॅम म्हणले जाते. त्यानुसार एक हजार मीटरला देखील एक किलोमीटर म्हटलं जातं.
किलोग्रॅम किंवा किलोमीटरला इंग्रजीमध्ये लिहित असताना स्पेलिंगची सुरूवात ही K अक्षरानं केली जाते. त्यामुळे K अक्षराला एक हजारचं प्रतिक मानले जाते. त्यामुळे हजार या शब्दासाठी K या शॉर्टकट अक्षराचा वापर केला जातो.
महत्वाच्या बातम्या :
- Health : 'या' आयुर्वेदिक औषधी करतील शारीरिक दुर्बलेवर मात, अनेक रोगांवर प्रभावी
- Health Tips : 'हा' आजार असलेल्यांनी चुकूनही करू नये शेंगदाण्यांचे सेवन; आरोग्यासाठी ठरेल हानिकारक
- Amla benefits : सुपरफूड अशा आवळ्याचे 'हे' गुणधर्म आणि वापरण्याची पद्धत तुम्हाला माहित आहे का?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha