IAS officer Shah Faesal : ऋषी सुनक (Rishi Sunak) हे ब्रिटनचे पहिले भारतीय वंशाचे पंतप्रधान बनले. त्यांनी पहिले भाषणही केले. जगभरातून सर्व प्रकारच्या प्रतिक्रिया आल्या. यामध्ये काश्मीरचे आयएएस अधिकारी शाह फैसल ( IAS officer Shah Faesal) यांची प्रतिक्रिया आली आहे. शाह फैसल यांनी पाकिस्तानसह (Pakistan) इतर इस्लामिक देशांचा समाचार घेतला. मुस्लिमांना भारतात जेवढे स्वातंत्र्य मिळते तसे जगात इतर कोठेही मिळत नाही असे लिहिले.


IAS शाह फैसल यांचे ट्विट मोठ्या प्रमाणात व्हायरल


ट्विटरवर मुस्लिम  पंतप्रधान संबंधित ट्रेंड सुरू असताना काश्मिरी IAS शाह फैसल यांचे ट्वीट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. शाह फैसल यांनी आपल्या ट्विटद्वारे इस्लामिक देशांवर निशाणा साधला आहे. यासोबतच भारताच्या लोकशाहीही जोरदार प्रशंसा केली आहे. शाह फैसलने सलग चार ट्विट केले आहेत. यादरम्यान त्यांनी ट्विटमध्ये लिहिले की, 'काश्मीरमधील मुस्लिम तरुण भारतीय नागरी सेवा परीक्षेत अव्वल होणे केवळ भारतातच शक्य आहे. सरकारच्या उच्च विभागांपर्यंत पोहोचू शकतो. सरकारच्या विरोधात जाऊ शकतो. 


 






भारतीय मुस्लिमांना समान नागरिक म्हणून वागणूक


याशिवाय IAS शाह फैसल यांनी ट्विट करून लिहिले की, 'ऋषी सुनक यांचे ब्रिटनचे पंतप्रधान होणे आपल्या शेजारच्या देशांना नक्कीच आश्चर्यचकित करू शकते, जिथे संविधान गैर मुस्लिमांना सरकारच्या मुख्य विभागांमध्ये प्रवेश करण्यापासून प्रतिबंधित करते. पण भारतीय राज्यघटनेने कधीच जातीय आणि धार्मिक अल्पसंख्याकांमध्ये भेदभाव केलेला नाही. इस्लामिक देश कल्पनाही करू शकत नाहीत इतके स्वातंत्र्य भारतीय मुस्लिम समान नागरिक म्हणून जगतात.


 






भारत हा नेहमीच सर्वांसाठी समान संधींचा देश



याशिवाय आयएएस शाह फैसल म्हणाले की, माझे स्वतःचे जीवन देखील एका प्रवासासारखे आहे, मी 130 कोटी देशवासियांच्या खांद्याला खांदा लावून चाललो आहे. इथे मला प्रत्येक वळणावर आपलेपणा, आदर, प्रोत्साहन आणि कधी प्रेम वाटले आहे. हा भारत आहे. याशिवाय शाह फैसल यांनी ट्वीट केले की, मौलाना आझाद ते डॉ. मनमोहन सिंग आणि डॉ. झाकीर हुसेन ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, भारत हा नेहमीच सर्वांसाठी समान संधींचा देश राहिला आहे. आताही शिखरावर पोहोचण्याचा मार्ग सर्वांसाठी खुला आहे. मी स्वतः सर्व काही वरून पाहिले आहे असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.