World's Dirtiest Man: जगातील सर्वात घाणेरड्या व्यक्तीचा मृत्यू (World's Dirtiest Man Died) झाला आहे.  अमौ हाजी (Iranian Man Amou Haji)  असे या व्यक्तीचे नाव असून  त्याने गेल्या पन्नास पेक्षा जास्त वर्षांपासून अंघोळ केली नव्हती.  जगातील सर्वात घाणेरडा माणूस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या इराणी व्यक्तीचे वय 94 आहे. इराणी मीडियाने ही माहिती दिली आहे. 


आईआरएनए समाचार या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अनेक दशके अंघोळ न केल्याने अमौ हाजीला जगातील सर्वात घाणेरडा व्यक्ती म्हणून ओळखले जात होते. अमौ हाजीला अंघोळ करण्याचा प्रचंड कंटाळा होता. हाजी अविवाहित होता. रविवारी ईराणच्या दक्षिण प्रांतातील देजगाह या गावात निधन झाले.


वृत्तसंस्थेने दिलेल्या एका स्थानिक अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, अमौ हाजीला आपण अंघोळ केली तर आपण आजारी पडू अशी भीती वाटत होती, म्हणून त्याने आंघोळ करणे सोडले होते. समोर आलेल्या माहितीनुसार काही महिन्यांपूर्वी गावातील स्थानिक नागगरिक त्याला अंघोळीसाठी घेऊन गेले होते. इतक्या वर्षानंतर अंघोळ केल्यानंतरा हाजीची तब्येत बिघडली. त्यानंतर काही दिवसापूर्वी त्याचा मृत्यू झाला. 






इराणी मीडियानुसार, 2013 साली हाजीच्या जीवनावर आधारित 'द स्ट्रेंज ऑफ अमौ हाजी' नावाची एक शार्ट डॉक्युमेंट्री बनवण्यात आली होती. तसेच हाजी रस्त्याच्या कडेला मरून पडलेले जनावरे (Animal Meal) खायचा. हाजीला धुम्रपान देखील करायचा. त्याला साळींदरचे मांस (Porcupine Meat) खायला आवडायचे. न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या माहितीनुसार, अमौ हाजी एकटा राहत होता. गावकऱ्यांनी त्यासाठी गावाच्याबाहेर एक घर बनवले होते. हाजीच्या मृत्यूनंतर त्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: