T20 World Cup 2022 Match Live Streaming : टी20 विश्वचषक 2022(T20 World Cup 2022) स्पर्धेत आजही दोन सामने खेळवले जाणार आहेत. यावेळी पहिला सामना स्कॉटलंड आणि आयर्लंड (SCO vs IRE) तर वेस्ट इंडीज विरुद्ध झिम्बाब्वे (WI vs ZIM) असा दुसरा सामना रंगणार आहे. स्कॉटलंडने पहिल्या सामन्यात वेस्ट इंडीजला मात दिली होती. तर झिम्बाब्वेनी आयर्लंडवर विजय मिळवला होता. तर आज पार पडणाऱ्या सामन्यांबद्दलची माहिती जाणून घेऊ...


कोणा-कोणाचे आहेत सामने?


आज दोन सामने खेळवले जाणार असून पहिला स्कॉटलंड विरुद्ध आयर्लंड आणि दुसरा सामना वेस्ट इंडीज विरुद्ध झिम्बाब्वे असा रंगणार आहे.


कधी होणार सामने?


भारतीय वेळेनुसार दिवसातील पहिला सामना आयर्लंड सकाळी 9.30 वाजता तर दुसरा वेस्ट इंडीज विरुद्ध झिम्बाब्वे सामना दुपारी 1.30 वाजता खेळवला जाईल.  


कुठे आहेत सामने?


आजचे दोन्ही सामने ऑस्ट्रेलियाच्या होबार्ट येथील बेलेरिव्ह ओव्हल या क्रिकेट स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत.  


कुठे पाहता येणार सामना?


या सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच डिज्नी+ हॉटस्टार अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com//amp येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील.   


कसे होते मंगळवारचे वर्ल्डकप सामने?


मंगळवारी अर्थात 18 ऑक्टोबरला झालेल्या दोन सामन्यांमधील पहिला सामना नेदरलँड विरुद्ध नामिबिया (NED vs NAM) यांच्यात सामना पार पडला. अगदी अखेरच्या षटकापर्यंत गेलेल्या सामन्यात अखेर नेदरलँडचा संघ जिंकला पण नामिबियाने कडवी झुंज नक्कीच दिली. आधी फलंदाजी करत नामिबियाचा संघ 20 षटकांत 121 धावाच करु शकला. ज्यानंतर फलंदाजीला आलेल्या नेदरलँड संघाला 122 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी अखेरच्या षटकापर्यंत मेहनत घ्यावी लागली. अखेर 3 चेंडू शिल्लक असताना नेदरलँडचा संघ विजयी झाला. तर दुसऱ्या सामन्यात श्रीलंका संघाने युएईला (SL vs UAE) 79 धावांनी मात दिली. यावेळी युएईचा युवा फिरकीपटू कार्तिक मयप्पनने (Karthik Meiyappan) यंदाच्या विश्वचषकातील पहिली वहिली हॅट्रीक घेतली खरी पण तरी युएईच्या फलंदाजांना खास कामगिरी करता न आल्याने 79 धावांनी सामना यूएईला गमवावा लागला. यावेळी आधी फलंदाजी करत श्रीलंका संघाने 153 धावांचे आव्हान युएईला दिले होते, पण युएईचा संघ 73 धावांवर सर्वबाद झाल्यामुळे सामना श्रीलंकेने 79 रनांनी जिंकला.


हे देखील वाचा-


Ruturaj Gaikwad : ऋतुराज गायकवाडची जबरदस्त खेळी! सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये ठोकलं दुसरं शतक, कोहली-शर्मालाही टाकलं मागे