Omicron Variant: कोरोना विषाणूचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉनमुळे (Omicron) जगभरात खळबळ उडाली आहे. ओमिक्रॉन जगातील 10 देशांमध्ये आढळला आहे. हा व्हेरियंट अधिक वेगाने पसरत असल्याचे म्हटले जात आहे.  नुकतेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (joe biden) यांनी  ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटबद्दल सांगितले. 


काही दिवसांपूर्वी व्हाइट हाऊसमध्ये ओमिक्रॉनबद्दल बोलताना जो बायडन यांनी सांगितले, 'हिवाळ्यात कोराना व्हायरससोबत लढा देण्यासाठी लवकरच नवी डिटेल स्ट्रॅटर्जी सादर केली जाईल. ओमिक्रॉन हा व्हेरियंट (Omicron) चिंतेचे कारण आहे, घाबरण्याचे कारण नाही. आम्ही या व्हेरियंटसाठी पूर्णपणे सतर्क आहोत. लॉकडाऊन किंवा शटडाऊन नाही यापेक्षा जास्तीत जास्त लसीकरण, बूस्टर शॉट्स यासह चाचणीच्या उद्देशाने आपण पुढे जाऊ. बूस्टर डोस घ्या.  या नवीन व्हेरियंटचा सामना पूर्वीच्या व्हेरिअंट प्रमाणेच करूयात. '






दक्षिण अफ्रिकेत कोरोनाचा नवा व्हेरियंट B.1.1529 गेल्या आठवड्यात आढळून आला होता. जागतिक आरोग्य संघटनानं या व्हेरिअंटला चिंताजनक घोषीत केले होते. तसेच या व्हेरियंटला ओमिक्रॉन नाव देण्यात आलं. दक्षिण अफ्रिकेच्या मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्ष डॉक्टर अँजेलिक कोएत्झी यांनी कोरोनाच्या नव्या  व्हेरियंटबाबत महत्वाची माहिती दिली. ओमिक्रॉनचा संसर्ग झालेल्या रुग्णाला अत्यंत थकवा, घसा खवखवणे, स्नायू दुखणे आणि कोरडा खोकला यांसारख्या समस्या जाणवतात. या व्हेरियंटटमुळं रुग्णांच्या शरीराचं तापमान वाढतं.