Covid 19 : कोरोना व्हायरसचा नवा प्रकार, ओमायक्रॉन व्हेरियंट (Omicron) वेगाने पसरत आहे. अशा परिस्थितीत लोकांमध्ये त्याच्याबद्दल जागरूक असणे आवश्यक आहे. ओमायक्रॉन विषाणू जितक्या वेगाने पसरत आहे, तितक्या वेगाने त्यातून रिकव्हरी देखील होत आहे. दुसरीकडे, सर्दी, घसादुखी, ताप अशी सामान्य लक्षणे ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्ये दिसून येत आहेत. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला देखील Omicron ची लागण झाली असेल, तर तुम्ही लवकरात लवकर बरे होण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. चला तर, जाणून घेऊया…


ऑक्सिजन पातळी तपासा  


ज्या लोकांनी अद्याप लसीकरण केलेले नाही, त्यांच्यामध्ये गंभीर समस्या दिसून येत आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही लस घेतली नसेल आणि तुम्हाला सतत तीन दिवसांपासून ताप येत असेल, तर तुम्ही तुमची ऑक्सिजन पातळी देखील तपासली पाहिजे.


या गोष्टी टाळा  


चॉकलेट, अल्कोहोल, थंड पदार्थ खाणे टाळा. शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित ठेवा. यासाठी भरपूर पाणी प्या. त्याच वेळी, होम आयसोलेशनमध्ये असताना, जर तुम्हाला गेल्या 72 तासांपासून ताप आला नसेल, तर तुम्ही तुमच्या नेहमीच्या दिनचर्येत परत येऊ शकता.


कोरोनापासून बचाव करण्यासाठी घराबाहेर पडण्यापूर्वी मास्क परिधान करणे विसरू नका. कारण, जेव्हा तुम्ही कोरोनामधून रिकव्हर होत असाल, तेव्हा तुम्हाला स्वतःची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. अन्यथा तुम्हाला पुन्हा संसर्ग होऊ शकतो.


ओमायक्रॉनची सामान्य लक्षणे :


* सर्दी आणि ताप.


* अशक्तपणा


* नाक गळणे


* घसा खवखवणे


* सुगंध कमी होणे


* कोरडा खोकला


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


संबंधित बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha