Omicron Sub Variant : भारतासह जगभरातील अनेक देश कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटशी (Omicron) झुंज देत आहेत. पण ओमायक्रॉनच्या नवीन उपप्रकार ओमायक्रॉन BA.2 ने पुन्हा एकदा लोकांची चिंता वाढवली आहे. आतापर्यंत भारतात या उपप्रकाराचे 530 नमुने सापडले आहेत. आतापर्यंत ब्रिटनमध्ये खळबळ उडवून देणारा ओमायक्रॉनचा हा नवीन उपप्रकार भारतासाठीही धोकादायक ठरत आहे. ओमायक्रॉन BA.2 हा मूळ ओमायक्रॉन व्हेरियंटपेक्षा अधिक वेगाने वाढणारा प्रकार मानला जातो. ब्रिटिश आरोग्य प्राधिकरणाने ओमायक्रॉनच्या या नवीन उपप्रकारची शेकडो प्रकरणे देखील ओळखली आहेत.
अहवालानुसार, BA.2 उपप्रकार ओमायक्रॉन व्हेरियंटपेक्षा अधिक धोकादायक आहे की नाही हे अद्याप सिद्ध झालेले नाही. युके आरोग्य सुरक्षा एजन्सी (UKHSA) च्या मते, ओमायक्रॉनचा उपप्रकार BA.2 ओमायक्रॉनपेक्षा वेगाने पसरत आहे. UKHSA चेतावणी दिली आहे की BA.2 मध्ये कोणतेही विशिष्ट उत्परिवर्तन झालेले नाही, ज्यामुळे हा विषाणू डेल्टा प्रकारापासून वेगळे केले जाऊ शकतो.
संपूर्ण जीनोम सिक्वेन्सिंग (WGS) द्वारे यूकेमध्ये आतापर्यंत ओमायक्रॉनच्या BA.2 प्रकाराच्या 426 प्रकरणांची पुष्टी झाली आहे. यासह, ओमायक्रॉनचा नवीन उपप्रकार जवळपास 40 देशांमध्ये पसरला आहे. यातील पहिल्या रुग्णाची नोंद 6 डिसेंबर 2021 रोजी झाली होती. ब्रिटनमधील लंडन शहरात सर्वाधिक 146 प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत.
अहवालानुसार, BA.2 उपप्रकार मूळ ओमायक्रॉनपेक्षा जास्त धोकादायक आहे की नाही हे अद्याप सिद्ध झालेले नाही. UKHSA च्या मते, हा नवीन प्रकार ओमायक्रॉनपेक्षा अधिक वेगाने पसरत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
- Coronavirus Cases Today : सलग तिसऱ्या दिवशी देशात कोरोनारुग्णांमध्ये घट, गेल्या 24 तासांत 3 लाख 6 हजार 64 नवीन कोरोनाबाधित
- Covid19 : इम्युनिटी वाढवतात 'या' गोष्टी, ओमायक्रॉनपासूनही होईल संरक्षण
- Olympic 2022 : बीजिंग ऑलिम्पिकपूर्वी 20 लाख लोकांची कोरोना चाचणी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha