Omicron Variant : ओमायक्रॉन व्हेरियंटपासून बचावासाठी नागरिकांना कोरोना लसीचा बूस्टर डोस द्यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. यातच सिंगापूरमधून आलेल्या बातमीनं चिंता वाढली आहे. सिंगापूर इथं बूस्टर डोस घेतलेल्या दोन नागरिकांना ओमायक्रॉन व्हेरियंटची लागण झाली आहे. विमानतळावर तपासणी करताना 24 वर्षीय युवतीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने खळबळ माजली. तर सहा डिसेंबर रोजी जर्मनीहून आलेल्या एका प्रवाशामध्ये ओमायक्रॉन आढळला आहे. या व्यक्तीनेही कोविड लसीचा बूस्टर डोस घेतला होता.  


प्राथमिक अभ्यासातून असं समोर आलेय की, ओमायक्रॉन व्हेरियंटला हरवण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसीचा बूस्टर डोसची गरज भासू शकते, असं फाइजर इंक आणि बायोएनटेक एसईने दोन दिवसांपूर्वी सांगितलं होतं. मात्र, सिंगापूरमध्ये आढललेल्या ओमायक्रॉनच्या रुग्णांनी चिंता वाढवली आहे.  सिंगापूरमध्ये आढळलेल्या दोन रुग्णांमध्ये अँटिबॉडीच प्रमाण खूप कमी आढळलं आहे.  सिंगापूरमधील आरोग्य कर्मचाऱ्याने सांगितलं की, 'कोरोनाचा ओमायक्रॉन हा व्हेरियंट झपाट्याने पसरतोय. जगातील अनेक देशांमध्ये हा व्हेरियंट अतिशय वेगानं पसरलाय. इतर व्हेरियंटच्या तुलनेनं ओमायक्रॉनचा समूह संसर्ग अतिशय वेगानं होतो.  त्यामुळे इथेही ओमायक्रॉनचे रुग्ण सापडण्याची भीती आहे. त्या रुग्णाचा शोध घ्यावा लागेल. '


देशात आढळलेल्या ओमायक्रॉन व्हेरियंटला विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. त्यांच्या संपर्कात असलेल्या सर्वांनाही क्वारंटाइन करण्यात आलं आहे. दहा दिवस सर्वांना क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात येणार आहे, असं सिंगापूरच्या आरोग्य मंत्रालयानं सांगितलं.  


सिंगापूरमध्ये मागील आठवड्यात समुह संसर्गांमध्ये मोठ्या प्रमाणात घट पाहायला मिळाली. रुग्णालयातील रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. ब्लूमबर्गद्वारा समोर आलेल्या आकडेवारीनुसार, जगातील लसीकरणामध्ये सिंगापूर आघाडीचे शहर आहे. येथील तब्बल 87 टक्के लोकांचं पूर्ण लसीकरण झालेय.  पात्र असलेल्या तब्बल 96 टक्के लोकांचं पूर्ण लसीकरण झालं आहे. यामध्ये सर्वाधिक फायजर आणि मॉर्डनच्या लसींना पसंती दिली आहे. सिंगापूरमधील जवळपास 29 टक्के नागरीकांना बूस्टर डोस देण्यात आली आहे. आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितलं की, 5-11 वयोगटातील मुलांसाठी लवकरच लस उपलब्ध होणार आहे. त्यांचेही लसीकरण वेगानं करण्यात येईल.