Oil Tanker Sinks Off Oman Coast: नवी दिल्ली : ओमानमधून (Oman) येमेनच्या दिशेनं जाणारं तेलवाहू जहाज बुडाल्याची माहिती मिळत आहे. ओमानच्या सागरी सुरक्षा केंद्रानं यासंदर्भात माहिती दिली आहे. ओमानच्या सागरी सुरक्षा केंद्राच्या म्हणण्यानुसार, या तेलाच्या टँकरचं नाव प्रेस्टीज फाल्कन असल्याचं सांगितलं जात आहे. तेलवाहू जहाजावर तब्बल 16 क्रू मेंबर्स असल्याची माहिती मिळत आहे. अद्याप या 16 जणांबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. 16 पैकी 13 जण भारतीय असल्याचंही समोर येत आहे. तसेच, तीन जण श्रीलंकेचे नागरिक आहेत. 


ओमानच्या सागरी सुरक्षा केंद्राने मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार, 13 भारतीयांसह 16 क्रू मेंबर्सना घेऊन जाणारं एक तेलवाहू जहाज ओमानच्या किनाऱ्याजवळ बुडालं आहे. क्रू मेंबर्स बेपत्ता असून, त्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यासोबतच बचावकार्यही सुरू करण्यात आलं आहे. सिक्योरिटी सेंटरनं सोशल मीडियावरुन दिलेल्या माहितीनुसार, कोमोरोसचा झेंडा असलेलं तेलवाहू जहाज 'Prestige Falcon' च्या क्रूमध्ये 13 भारतीय आणि तीन श्रीलंकेचे नागरिक आहेत. ओमानी बंदर डुक्मजवळ रास मदारकाच्या आग्नेय-पूर्वेस 25 नॉटिकल मैलांवर सोमवारी जहाज कोसळले.


तेलवाहू जहाज ओमानहून येमेनच्या दिशेनं निघालेलं 


रॉयटर्सनं दिलेल्या वृत्तानुसार, ओमानच्या सागरी सुरक्षा केंद्रानं दिलेल्या माहितीनुसार, तेलवाहू जहाज पाण्यात बुडाला असून पलटी झाला होता'. दरम्यान, जहाज पुन्हा स्थिर झालंय की नाही? जहाज बुडाल्यानंतर समुद्रात त्यातून तेल गळती झाली आहे की नाही? याची अद्याप पुष् झालेली नाही. LSEG कडील शिपिंग डेटावरून असं दिसून आलं आहे की, हे जहाज 2007 मध्ये बांधलेले 117 मीटर लांबीचं तेल उत्पादन टँकर आहे. अशी छोटी तेलवाहू जहाजं सहसा कमी अंतराच्या प्रवासासाठी किंवा कमी अंतरावर तेल वाहून नेण्यासाठी असतात. 


माहिती मिळताच अधिकाऱ्यांकडून बचावकार्य सुरू 


सागरी सुरक्षा केंद्रानं ट्वीट करून माहिती दिली आहे की, हा कोमोरोस ध्वजांकित तेल टँकर रास मद्राकाच्या दक्षिण पूर्वेस 25NM बुडाला आहे. त्याच्या शोध आणि बचावासाठी आवश्यक मार्गदर्शक सूचनांनुसार, तपासाचं काम सुरू करण्यात आलं आहे.


दरम्यान, ओमानच्या दक्षिण-पश्चिम किनाऱ्यावर स्थित दुक्म बंदर, देशातील प्रमुख तेल आणि वायू खाण प्रकल्पांसाठी एक महत्त्वाचे केंद्र आहे. राज्यातील सर्वात मोठा सिंगर इकॉनॉमिक प्रकल्प, डुकमच्या विशाल औद्योगिक क्षेत्राचा एक प्रमुख तेल शुद्धीकरण कारखाना आहे.