North Korea News : उत्तर कोरियामध्ये (North Korea) कोरियन ड्रामा (Korean Drama) बघितल्याने 30 विद्यार्थ्यांची निघृणपणे हत्या करण्यात आली आहे. हुकुमशाह किम जोंग उनच्या (Kim Jong Un) सरकारने के-ड्रामा  (K-Drama) पाहिल्याने 30 विद्यार्थ्यांना कठोर शिक्षा देण्यात आली आहे. किम जोंग उनच्या आदेशावरुन 30 विद्यार्थ्यांना (Students) भरचौकात गोळ्या घालण्यात आल्याची माहिती मिडिया रिपोर्ट्समधून समोर येत आहे. कोरियन वृत्तपत्र 'जोंगआंग डेली'च्या वृत्तानुसार, ही घटना गेल्या आठवड्यात घडली होती, ज्याचा माहिती आता समोर आल्याचं सांगितलं जात आहे. 


हुकुमशाह किम जोंगनं गाठला क्रूरतेचा कळस


दक्षिण कोरिया (South Korea) आणि उत्तर कोरिया (North Kores) या देशांमध्ये तणाव सर्वज्ञात आहे. हुकुमशाह किंग जोंग उनने (Kim Jong Un) उत्तर कोरियामध्ये कोरियन ड्रामा (Korean Drama) पाहण्यास बंदी घातली आहे. तसेच, उत्तर कोरियामध्ये यूट्यूब (YouTube) आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही (Social Media Platform) बंदी आहे. येथे फक्त रशियन सिनेमा आणि सरकारमान्य काही वेबसाईटवर वापरता येतात. इतर सर्व चित्रपट आणि नाटक तसेच गाणी ऐकण्यावरही बंदी आहे.


K-Drama बघितल्याने 30 विद्यार्थ्यांची गोळ्या झाडून हत्या


उत्तर कोरियातील किम जोंग उनच्या हुकुमशाही सरकारने दक्षिण कोरियातील नाटक (K-Drama) आणि चित्रपट पाहण्यास बंदी घातली आहे. दक्षिण कोरियन नाटक पाहिल्याच्या कथित आरोपा खाली 30 विद्यार्थ्यांची हत्या करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात सुमारे 30 शालेय विद्यार्थ्यांना गोळ्या घालण्यात आल्याचं दक्षिण कोरियातील मीडिया आउटलेट्स चोसून टीव्ही आणि कोरिया जोंगआंग डेलीने ही बातमी दिली आहे. या सर्व विद्यार्थ्यांचं वय 19 वर्षांखालील होतं.


उत्तर कोरियामध्ये के-ड्रामावर बंदी


या वर्षाच्या सुरुवातीला उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जोंन उनने उघडपणे दक्षिण कोरिया आपल्या देशाचा सर्वात मोठा शत्रू असल्याची घोषणा केली होती. हे शत्रुत्व फक्त सरकार किंवा लष्कर याापुरते मर्यादित नाही. टेलिव्हिजन शोसह उत्तर कोरियामध्ये दक्षिण कोरियातील मनोरंजक कंट पाहणेही बेकायदेशीर आहे. जगभरात 'के-ड्रामा' लोकप्रिय आहे, पण उत्तर कोरियामध्ये प्रसारित केले जाऊ शकत नाही. उत्तर कोरियामध्येही के-ड्रामा लोकप्रिय आहे. के-ड्रामा पेन ड्राईव्हद्वारे बेकायदेशीरपणे उत्तर कोरियात पोहोचतात आणि गुप्तपणे पाहिले जातात. अशाच एका प्रकरणात 30 विद्यार्थ्यांना कठोर शिक्षा देत त्यांना गोळ्या झाडण्यात आल्या आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Kim Jong Un : किम जोंगला खूश करण्यासाठी शाळांमधून 25 कुमारी मुलींची निवड, उत्तर कोरियाच्या हुकूमशाहाचा 'प्लेजर स्क्वॉड'