तर दुसरीकडे उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग यांनेही अमेरिकेला वीजपुरवठा खंडित करण्याची धमकी दिली आहे. उत्तर कोरिया सॅटेलाईटच्या माध्यमातून अमेरिकेच्या पॉवर ग्रीडवर हल्ले करुन, ते बंद पाडण्याची भीती व्यक्त होत आहे. जर असे झाले, तर अमेरिकेची बत्ती गुल्ल होण्याची शक्यता आहे.
अण्वस्त्र परिक्षण आत्मरक्षणासाठी असल्याचा दावा
उत्तर कोरियाच्या राजदूत हान तेई सॉन्ग याने जिनेवामधील एका कार्यक्रमात बोलताना अण्वस्त्र परिक्षणाचा कार्यक्रम आत्मरक्षणासाठी असल्याचं म्हटलं आहे. ते म्हणाले की, ''माझ्या देशाने नुकतीच जी पावलं उचलली आहे, वास्तविक, अमेरिकेसाठी त्या भेट वस्तूप्रमाणे आहेत. अमेरिकेला माझ्या देशाकडून अशा भेट वस्तू तोपर्यंत मिळत राहतील, जोपर्यंत ते आम्हाला चिथावणी देणं, किंवा आमच्यावर दबाव आणण्याचे प्रयत्न बंद करत नाहीत.''
अण्वस्त्र युद्धाची चिंता
सध्या उत्तर कोरियाच्या अण्वस्त्र परिक्षण कार्यक्रमांमुळे जग अण्वस्त्र युद्धाच्या आगीत ढकलले जात आहे. उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग यांनी नुकताच हायड्रोजन बॉम्बचं परिक्षण केल्यानंतर, आता मिसाईल परिक्षण करण्याच्या तयारी सुरु केली आहे. त्यामुळेच अमेरिकेने किंम जोंगला धडा शिकवण्याची वेळ आली असल्याचा इशारा दिला आहे.
दक्षिण कोरियामध्ये हाय अलर्ट
सध्या या तणावाच्या पार्श्वभूमीवर दक्षिण कोरियामध्ये हाय अलर्ट जारी केला आहे. कारण, उत्तर कोरियाने युद्धाची तयारी केली असून, जमीन, आकाश आणि समुद्र या तिन्ही मार्गावरुन उत्तर कोरियाला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी तयारी सुरु आहे.
अमेरिका दक्षिण कोरियाच्या बाजूने
दरम्यान, दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया यांच्यातील सुरु असलेली 'तू-तू मै-मै'वरुन संपूर्ण जग चिंतेत आहे. कारण, उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंगने दक्षिण कोरियाबद्दलचा द्वेष वारंवार व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे, उत्तर कोरिया अण्वस्त्र संपन्न देश झाला आहे, तर दक्षिण कोरिया अजूनही अण्वस्त्र संपन्न देश नाही. पण अमेरिका दक्षिण कोरियाच्या बाजूने उभी असल्याने दक्षिण कोरियासाठी ती दिलासा देणारी बाब आहे.
त्यामुळे उत्तर कोरियाने दक्षिण कोरियावर हल्ला चढवल्यास, तो हल्ला अमेरिकेवरच चढवल्यासारखे असेल असे मानले जात आहे. कारण, युद्धाला तोंड फुटल्यास अमेरिका आपली सर्व ताकद दक्षिण कोरियाच्या बाजूने उभी करेल, हे सत्य आहे.
उत्तर कोरियाची युद्धासाठी हलचाल सुरु
दुसरीकडे उत्तर कोरियाकडून मिसाईलची वाहतूक रात्रीच्या वेळेस पश्चिम समुद्र किनाऱ्यावर होत आहे. ज्यामुळे त्यांच्या हलचालींवर लक्ष्य ठेवणे अडचणीचे होत आहे. त्यातच मिसाईल डागण्याच्या सर्व अधुनिक सुविधा पश्चिमी किनाऱ्यावर आहेत. त्यामुळे युद्धाला तोंड फुटल्यास, पश्चिम किनाऱ्यावरुनच या सर्व मिसाईल्स डागल्या जातील.
भारताला चिंता
दरम्यान, युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताची चिंताही वाढली आहे. कारण, यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या त्या वक्तव्याचा हवाला देण्यात येत आहे, ज्यात त्यांनी उत्तर कोरियाशी संबंध ठेवणाऱ्या देशांचा बहिष्कार करेल.
या वक्तव्यानुसार, भारताची चिंता वाढणे स्वाभाविक आहे. कारण, उत्तर कोरिया आणि भारत या दोन्ही देशांमध्ये अनेक वर्षांपासून कुटनिती आणि वाणिज्यिक संबंध आहेत. द ऑब्जर्वेटरी ऑफ इकॉनॉमिक कॉम्प्लेक्सिटीच्या माहितीनुसार, उत्तर कोरियासोबतच्या आयात आणि निर्यातीत चीननंतर भारत दुसरा देश आहे.
संबंधित बातम्या