एक्स्प्लोर

...त्या माध्यमातून अमेरिकेला भेटवस्तू दिली, उत्तर कोरियाची धमकी

उत्तर कोरियाच्या राजदूताने अमेरिकेला आणखी एक धमकी दिली आहे. माझ्या देशाने उचलेली पावले, अमेरिकेसाठी असल्याचं उत्तर कोरियाचे राजदूत हान तेई सॉन्ग यांनी म्हंटलं आहे.

सोल : उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंगकडून सातत्याने जगाला अण्वस्त्र युद्धाकडे घेऊन जाण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यातच आता उत्तर कोरियाच्या राजदूताने अमेरिकेला आणखी एक धमकी दिली आहे. माझ्या देशाने उचलेली पावले, अमेरिकेसाठी असल्याचं उत्तर कोरियाचे राजदूत हान तेई सॉन्ग यांनी म्हंटलं आहे. तर दुसरीकडे उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग यांनेही अमेरिकेला वीजपुरवठा खंडित करण्याची धमकी दिली आहे. उत्तर कोरिया सॅटेलाईटच्या माध्यमातून अमेरिकेच्या पॉवर ग्रीडवर हल्ले करुन, ते बंद पाडण्याची भीती व्यक्त होत आहे. जर असे झाले, तर अमेरिकेची बत्ती गुल्ल होण्याची शक्यता आहे. अण्वस्त्र परिक्षण आत्मरक्षणासाठी असल्याचा दावा उत्तर कोरियाच्या राजदूत हान तेई सॉन्ग याने जिनेवामधील एका कार्यक्रमात बोलताना अण्वस्त्र परिक्षणाचा कार्यक्रम आत्मरक्षणासाठी असल्याचं म्हटलं आहे. ते म्हणाले की, ''माझ्या देशाने नुकतीच जी पावलं उचलली आहे, वास्तविक, अमेरिकेसाठी त्या भेट वस्तूप्रमाणे आहेत. अमेरिकेला माझ्या देशाकडून अशा भेट वस्तू तोपर्यंत मिळत राहतील, जोपर्यंत ते आम्हाला चिथावणी देणं, किंवा आमच्यावर दबाव आणण्याचे प्रयत्न बंद करत नाहीत.'' अण्वस्त्र युद्धाची चिंता सध्या उत्तर कोरियाच्या अण्वस्त्र परिक्षण कार्यक्रमांमुळे जग अण्वस्त्र युद्धाच्या आगीत ढकलले जात आहे. उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग यांनी नुकताच हायड्रोजन बॉम्बचं परिक्षण केल्यानंतर, आता मिसाईल परिक्षण करण्याच्या तयारी सुरु केली आहे. त्यामुळेच अमेरिकेने किंम जोंगला धडा शिकवण्याची वेळ आली असल्याचा इशारा दिला आहे. दक्षिण कोरियामध्ये हाय अलर्ट सध्या या तणावाच्या पार्श्वभूमीवर दक्षिण कोरियामध्ये हाय अलर्ट जारी केला आहे. कारण, उत्तर कोरियाने युद्धाची तयारी केली असून, जमीन, आकाश आणि समुद्र या तिन्ही मार्गावरुन उत्तर कोरियाला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी तयारी सुरु आहे. अमेरिका दक्षिण कोरियाच्या बाजूने दरम्यान, दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया यांच्यातील सुरु असलेली 'तू-तू मै-मै'वरुन संपूर्ण जग चिंतेत आहे. कारण, उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंगने दक्षिण कोरियाबद्दलचा द्वेष वारंवार व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे, उत्तर कोरिया अण्वस्त्र संपन्न देश झाला आहे, तर दक्षिण कोरिया अजूनही अण्वस्त्र संपन्न देश नाही. पण अमेरिका दक्षिण कोरियाच्या बाजूने उभी असल्याने दक्षिण कोरियासाठी ती दिलासा देणारी बाब आहे. त्यामुळे उत्तर कोरियाने दक्षिण कोरियावर हल्ला चढवल्यास, तो हल्ला अमेरिकेवरच चढवल्यासारखे असेल असे मानले जात आहे. कारण, युद्धाला तोंड फुटल्यास अमेरिका आपली सर्व ताकद दक्षिण कोरियाच्या बाजूने उभी करेल, हे सत्य आहे. उत्तर कोरियाची युद्धासाठी हलचाल सुरु दुसरीकडे उत्तर कोरियाकडून मिसाईलची वाहतूक रात्रीच्या वेळेस पश्चिम समुद्र किनाऱ्यावर होत आहे. ज्यामुळे त्यांच्या हलचालींवर लक्ष्य ठेवणे अडचणीचे होत आहे. त्यातच मिसाईल डागण्याच्या सर्व अधुनिक सुविधा पश्चिमी किनाऱ्यावर आहेत. त्यामुळे युद्धाला तोंड फुटल्यास, पश्चिम किनाऱ्यावरुनच या सर्व मिसाईल्स डागल्या जातील. भारताला चिंता दरम्यान, युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताची चिंताही वाढली आहे. कारण, यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या त्या वक्तव्याचा हवाला देण्यात येत आहे, ज्यात त्यांनी उत्तर कोरियाशी संबंध ठेवणाऱ्या देशांचा बहिष्कार करेल. या वक्तव्यानुसार, भारताची चिंता वाढणे स्वाभाविक आहे. कारण, उत्तर कोरिया आणि भारत या दोन्ही देशांमध्ये अनेक वर्षांपासून कुटनिती आणि वाणिज्यिक संबंध आहेत. द ऑब्जर्वेटरी ऑफ इकॉनॉमिक कॉम्प्लेक्सिटीच्या माहितीनुसार, उत्तर कोरियासोबतच्या आयात आणि निर्यातीत चीननंतर भारत दुसरा देश आहे. संबंधित बातम्या

उत्तर कोरियाच्या किम जोंगचे 20 क्रूर कारनामे

उत्तर कोरियाकडून हायड्रोजन बॉम्बची चाचणी, जगात चिंतेचं वातावरण

...तर परिणाम भोगायला तयार राहा : डोनाल्ड ट्रम्प

उत्तर कोरियाने जपानवरुन मिसाईल सोडलं, दोन्ही देशात तणाव

उत्तर कोरियासंदर्भातील ट्विटवरुन चिनी मीडियाची ट्रम्प प्रशासनावर आगपाखड

उत्तर कोरिया: बैठकीत लागली डुलकी, संरक्षण मंत्र्याना धाडलं यमसदनी!

महत्त्वाच्या बातम्या

India America Trade Deal: भारत अमेरिकेला काय काय विकतो आणि अमेरिकेकडून काय खरेदी करतो?, A टू Z माहिती
भारत अमेरिकेला काय काय विकतो आणि अमेरिकेकडून काय खरेदी करतो?, A टू Z माहिती
H1B Visa: तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
Mojtaba khamenei Video: कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
गॅस आयात धोरणात मोठा बदल, 67 टक्के LPG  गॅस एकाच देशातून आयात होणार, सरकारनं घेतला मोठा निर्णय
गॅस आयात धोरणात मोठा बदल, 67 टक्के LPG  गॅस एकाच देशातून आयात होणार, सरकारनं घेतला मोठा निर्णय

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget