एक्स्प्लोर

हायड्रोजन बॉम्ब टाकू, उ. कोरियाची अमेरिकेला धमकी

"जर अमेरिकेने आमच्याविरोधात कोणत्याही प्रकारची कारवाई केली, तर आम्ही आमचा शक्तीशाली हायड्रोजन बॉम्ब पॅसिफिस महासागरात टाकू," असंही उत्तर कोरियाचे परराष्ट्र मंत्री म्हणाले.

न्यूयॉर्क : उत्तर कोरियाने पुन्हा एकदा अमेरिकेला आव्हान दिलं आहे. अमेरिकेजवळ पॅसिफिक महासागरात हायड्रोजन बॉम्बचा स्फोट घडवून हादरवून टाकू अशी धमकी उत्तर कोरियाचे परराष्ट्र मंत्री रि योंग हो यांनी दिली आहे. याआधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीला त्यांनी भुंकणाऱ्या कुत्र्याची उपमा दिली होती. "जर अमेरिकेने आमच्याविरोधात कोणत्याही प्रकारची कारवाई केली, तर आम्ही आमचा शक्तीशाली हायड्रोजन बॉम्ब पॅसिफिस महासागरात टाकू," असंही उत्तर कोरियाचे परराष्ट्र मंत्री म्हणाले. उत्तर कोरियाचे हुकुमशाह किम जोंग उन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना धमक्यांची किंमत मोजावी लागेल असं म्हटलं होतं. त्यानंतर आता परराष्ट्र मंत्र्यांनी अमेरिकेला धमकी दिली आहे. "पॅसिफिक महासागरातील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा हायड्रोजन बॉम्बस्फोट असेल. यासाठी काय कारवाई करावी लागेल, हे आम्हाला माहित नाही. कारण किम जोंग उन यांच्या आदेशानंतरच कारवाई केली जाईल. डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीनंतर किम जोंग कठोर पावलं उचलण्याचा विचार करत आहेत," असं री योंग हो यांनी सांगितलं. संयुक्त राष्ट्रसंघातील आपल्या पहिल्या भाषणात डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर कोरियाला पूर्णत: नष्ट करण्याची धमकी दिली होती. रॉकेट मॅन (किम) स्वत:साठी आणि स्वत:च्या देशासाठी सुसाईड मिशनवर आहेत. जर उत्तर कोरियाने अमेरिका आणि मित्र राष्ट्रांवर हल्ला केला, तर प्योंगयांग उद्ध्वस्त करण्याशिवाय वॉशिंग्टनकडे पर्याय शिल्लक राहणार नाही, असं ट्रम्प म्हणाले होते. या महिन्याच्या सुरुवातीलाच उत्तर कोरियाने आपल्या सर्वात शक्तीशाली हायड्रोजन बॉम्बचं यशस्वी परीक्षण केलं होतं. या बॉम्बच्या स्फोटामुळे चीनच्या सीमेवर 6.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा धक्का बसला होता. हायड्रोजन बॉम्ब म्हणजे काय? हायड्रोजन बॉम्बला थर्मोन्युक्लिअर बॉम्बही म्हटलं जातं. हायड्रोजन बॉम्बची संहारक क्षमता अणुबॉम्बपेक्षा कित्येक पटींनी अधिक आहे. हायड्रोजन बॉम्बची पहिली चाचमी अमेरिकेने 1 नोव्हेंबर 1952 ला घेतली त्यापाठोपाठ रशियाने ऑक्टोबर 1961 मध्ये हायड्रोजन बॉम्बची चाचणी केली सुदैवाने आजवरच्या कोणत्याही युद्धात या बॉम्बचा वापर झाला नाही Hydrogen_Bomb हायड्रोजन बॉम्ब टाकल्यास काय होईल? उत्तर कोरियाने वॉशिंग्टनवर 10 किलोटनचा हायड्रोजन बॉम्ब टाकल्यास एक लाखांहून अधिक लोक मृत्यूमुखी पडतील. 1 लाख 75 हजारांपेक्षा जास्त लोक गंभीररित्या जखमी होतील. औषधोपचार सुरु करण्यापूर्वीच 50 ते 90 टक्के लोक मरतील औष्णिक किरोणत्सर्गामुळे संपूर्ण शरीर भाजून निघते वेदनांची जाणीव करुन देणाऱ्या शिराही नष्ट होत असल्याने औष्णिक किरणोत्सर्गामुळे भाजल्याच्या वेदनाही होत नाहीत शरीरातील अवयव आयुष्यभरासाठी निकामी होऊ शकतात.

महत्त्वाच्या बातम्या

Pahalgam Attack: लश्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदने पहलगाम हल्ल्याचा कट रचला; एनआयएच्या आरोपपत्रात आतापर्यंत झालेले पाच खुलासे
लश्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदने पहलगाम हल्ल्याचा कट रचला; एनआयएच्या आरोपपत्रात आतापर्यंत झालेले पाच खुलासे
Ethanol :  आता विमाने इथेनॉलवर उड्डाण करणार, जुन्या जेट इंधनावरील अवलंबित्व कमी होणार
Ethanol :  आता विमाने इथेनॉलवर उड्डाण करणार, जुन्या जेट इंधनावरील अवलंबित्व कमी होणार
Ayatollah Ali Khamenei: इराणचे सर्वोच्च धर्मगुरु अयातुल्ला खामेनींना शेवटचा निरोप देण्यासाठी कोट्यवधी देशवासी जनता फक्त काळ्या रंगाच्या पोशाखातच का पोहोचली?
इराणचे सर्वोच्च धर्मगुरु अयातुल्ला खामेनींना शेवटचा निरोप देण्यासाठी कोट्यवधी देशवासी जनता फक्त काळ्या रंगाच्या पोशाखातच का पोहोचली?
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनींच्या अंत्ययात्रेला रणरणत्या उन्हात कोट्यवधींचा अभूतपूर्व जनसमुदाय; भारतासह 100 देशांचे प्रतिनिधी हजर, अंतिम दर्शनासाठी तासनतास रांगेत
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनींच्या अंत्ययात्रेला रणरणत्या उन्हात कोट्यवधींचा अभूतपूर्व जनसमुदाय; भारतासह 100 देशांचे प्रतिनिधी हजर, अंतिम दर्शनासाठी तासनतास रांगेत

व्हिडीओ

Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले
Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?
Raigad Flood | चार नद्या धोक्याच्या पातळीवर; बचावकार्याचं आव्हान, रायगडला पाण्याने वेढलं | ABP Majha Special Report
Vasai-Virar Flood | पावसाने वसई-विरार, नालासोपारा जलमय; जनजीवन पूर्ण विस्कळीत - ABP Majha
Missing Link Landslide | उद्घाटनानंतरच दरड; मिसिंगलिंकवरुन राजकारण | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dipali Sayyed : तुम्हाला का झोंबतंय? 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'वर रुपाली चाकणकरांचा 25 कोटीचा दावा, दिपाली सय्यद यांचा रोख सवाल
तुम्हाला का झोंबतंय? 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'वर रुपाली चाकणकरांचा 25 कोटीचा दावा, दिपाली सय्यद यांचा रोख सवाल
ह्रदयद्रावक... सेल्फी घेताना मित्र खदानीत पडला, मित्राला वाचवताना दोघेही बुडाले; तिघांचा मृत्यू, गावावर शोककळा
ह्रदयद्रावक... सेल्फी घेताना मित्र खदानीत पडला, मित्राला वाचवताना दोघेही बुडाले; तिघांचा मृत्यू, गावावर शोककळा
तावडे-जयंत पाटलांची भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत येणार का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्लीतून दिली माहिती
तावडे-जयंत पाटलांची भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत येणार का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्लीतून दिली माहिती
SIP Calculator: दरमहा 3000 रुपयांच्या गुंतवणुकीवर 15 लाख रुपयांचा फंड बनवणं शक्य? जाणून घ्या संपूर्ण समीकरण
दरमहा 3000 रुपयांच्या गुंतवणुकीवर 15 लाख रुपयांचा फंड बनवणं शक्य? जाणून घ्या संपूर्ण समीकरण
धक्कादायक! नांदेड जिल्ह्यात कौटुंबिक वादातून पत्नीवरच तीन गोळ्या झाडल्या; आरोपी पती फरार, शहरात खळबळ
धक्कादायक! नांदेड जिल्ह्यात कौटुंबिक वादातून पत्नीवरच तीन गोळ्या झाडल्या; आरोपी पती फरार, शहरात खळबळ
राष्ट्रवादीला दे धक्का, महापालिकेतील नगरसेविका अश्विनी कोळींचे पद धोक्यात; जात प्रमाणपत्र जप्त करण्याचे आदेश
राष्ट्रवादीला दे धक्का, महापालिकेतील नगरसेविका अश्विनी कोळींचे पद धोक्यात; जात प्रमाणपत्र जप्त करण्याचे आदेश
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 जुलै 2026 | मंगळवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 जुलै 2026 | मंगळवार 
Ambadas Danve: रमाई आवास योजनेत मोठा भ्रष्टाचार; भाजप नगरसेविकेचा मुलगा लाभार्थी, देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदेंच्या नावे टॅक्स पावती; अंबादास दानवेंचा गंभीर आरोप
छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील रमाई आवास योजनेत मोठा भ्रष्टाचार; भाजप नगरसेविकेचा मुलगा लाभार्थी, देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदेंच्या नावे टॅक्स पावती; अंबादास दानवेंचा गंभीर आरोप
Embed widget